पिंपरी : दापोडीतील 'सीएमई' मधून झाडांची चोरी; 13 जणांना अटक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 फेब्रुवारी 2020

रविवारी (ता. 9) सायंकाळी सहाच्या सुमारास आरोपी दापोडीतील मिनाताई ठाकरे शाळेच्या पाठीमागे असलेली सीएमई सिमाभिंत क्रेनच्या सहाय्याने तोडून आत शिरले. त्याठिकाणची 25 हजार रूपये किंमतीची बाभळीची पाच झाडे तोडून चोरून नेली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर भोसरी पोलिसांनी 13 जणांना अटक केली.

पिंपरी : दापोडीतील लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयाची (सीएमई) सिमाभिंत तोडून पाच झाडांची चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी भोसरी पोलिसांनी 13 जणांना अटक केली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

याप्रकरणी सीएमईतील दत्तात्रय सर्जेराव यादव यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार नफीज सलीम शेख (वय 36, रा. ओटास्किम, निगडी), सागर रमेश सुरपाटणे (वय 27, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी), नफीज अब्दुल खालिद (वय 30), मोहम्मद नन्हआ राशिद कुरेशी (वय 45, दोघेही रा. ओटास्किम, निगडी), रत्नेश रामलवट केवट (वय 25, रा. काळभोरनगर, चिंचवड), संतोष हरिश्‍चंद्र चौधरी (वय 20, रा. लांडेवाडी, भोसरी), मोहम्मद शहजाद कमरुद्दीन अब्बासरी (वय 22, रा. ओटास्किम, निगडी), मोहम्मद अब्दुल वाहीद शेख (वय 22), सर्वेश कुमार रामलवट केवट (वय 22) , सुनिलकुमार छोटेलाल निषाद (वय 22, दोघेही रा. काळभोरनगर, चिंचवड), सुरेंद्र रामशब्द यादव (वय 42, रा. दुर्गानगर, आकुर्डी), अनुवार नथू मलिक (वय 35, रा. ओटास्किम, निगडी), मोहम्मद आकीम कमाल अहमद काझी (वय 22, रा. ओटास्किम, निगडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

- पुण्याच्या बातम्यांसाठी येथे ► क्लिक करा

रविवारी (ता. 9) सायंकाळी सहाच्या सुमारास आरोपी दापोडीतील मिनाताई ठाकरे शाळेच्या पाठीमागे असलेली सीएमई सिमाभिंत क्रेनच्या सहाय्याने तोडून आत शिरले. त्याठिकाणची 25 हजार रूपये किंमतीची बाभळीची पाच झाडे तोडून चोरून नेली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर भोसरी पोलिसांनी 13 जणांना अटक केली.

पुणे : कोंढव्यात भरधाव टँकरच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: thirteen arrested for stealing trees from CME in Dapodi

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: