‘थर्टी फर्स्ट’निमित्त काही भागांतील वाहतुकीत बदल

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 डिसेंबर 2018

पुणे - सरत्या वर्षाला निरोप देतानाच (३१ डिसेंबर) पुणेकरांना नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत करता यावे, यासाठी वाहतूक शाखेने प्रमुख रस्त्यांसह काही भागांमधील वाहतुकीमध्ये बदल केला आहे. काही भागांतील सिग्नल पहाटेपर्यंत सुरू ठेवण्यात येणार असून, रस्ते बंदी व काही ठिकाणी ‘नो व्हेईकल झोन’ करण्यात आला आहे. त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

पुणे - सरत्या वर्षाला निरोप देतानाच (३१ डिसेंबर) पुणेकरांना नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत करता यावे, यासाठी वाहतूक शाखेने प्रमुख रस्त्यांसह काही भागांमधील वाहतुकीमध्ये बदल केला आहे. काही भागांतील सिग्नल पहाटेपर्यंत सुरू ठेवण्यात येणार असून, रस्ते बंदी व काही ठिकाणी ‘नो व्हेईकल झोन’ करण्यात आला आहे. त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

नो व्हेईकल झोन 
(३१ डिसेंबर सायंकाळी ६ ते १ जानेवारी पहाटे ५ वाजेपर्यंत)
  फर्ग्युसन रस्ता - गुडलक चौक ते फर्ग्युसन महाविद्यालय मुख्य प्रवेशद्वारापर्यंत
 महात्मा गांधी रस्ता - हॉटेल अरोरा टॉवर चौक ते ड्रायलक चौक (पुलगेट चौकीपर्यंत)

वाहतूक वळविण्यात आलेले रस्ते
लष्कर परिसर -

    वाय जंक्‍शन - खान्या मारुती चौकाकडून येणारी वाहतूक ईस्ट स्ट्रीट रस्त्याने व्होल्गा चौकाकडे जाईल.
    व्होल्गा चौक - व्होल्गा चौकातून प्रीत मंदिर चौक व इंदिरा गांधी चौकातून पुढे. 
    लष्कर पोलिस ठाणे चौक - इंदिरा गांधी चौकातून उजवीकडे वळून लष्कर पोलिस ठाणे येथून तीन तोफ चौकाकडे.
    तीन तोफ चौक - उजवीकडे वळून एसबीआय हाउसकडे.
    यामाहा शोरूम - कुरेशी मशिदकडून १५ ऑगस्ट चौकाकडील वाहतूक सुजाता मस्तानी लेनमार्गे पुढे.
    बिशप सर्कल - मम्मादेवी चौकातून येणारी वाहतूक बिशप सर्कल येथून गुरुद्वारा रस्त्याने एसबीआय हाउसकडे जाईल.

हडपसर परिसर (३१ डिसेंबर सायंकाळी ७ ते १ जानेवारी रात्री १ वाजेपर्यंत) :
    ॲमनोरा मॉलजवळून जाणारी वाहने डावीकडे वळून पुढे जातील. खराडीकडे जाणारी वाहने मगरपट्टा मेन गेटने पुढे जातील.
    सीझन मॉलसमोरील रस्त्यावरून मगरपट्टा रस्त्यावर जाता येणार नाही. मगरपट्ट्याकडे जाणाऱ्या वाहनांनी रेल्वे पुलाखालून यू टर्न घेऊन पुढे जावे.
    खराडीकडे जाणाऱ्या वाहनांनी नोबेल हॉस्पिटलकडे वळून मगरपट्ट्यामागील रस्त्याने हडपसर रेल्वे पुलावरून पुढे जावे.

येरवडा परिसर (३१ डिसेंबर रात्री ९ ते १ जानेवारी रात्री १२ वाजेपर्यंत)
    पुणे व पिंपरी-चिंचवडमधून नगर रस्त्यावरून पुढे जाणाऱ्या सर्व वाहनांना ३१ डिसेंबरला रात्री ९ वाजल्यापासून ते १ जानेवारी २०१९ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत या रस्त्यावरून जाता येणार नाही (पेरणे फाटा रणस्तंभाकडे जाणाऱ्या वाहनांना पुढे जाता येईल). वाहनचालकांनी खराडी बाह्यवळण येथून उजवीकडे वळून हडपसर येथून सरळ सोलापूर महामार्गावरून चौफुला-न्हावरे मार्गे अहमदनगरकडे जावे.

१ जानेवारीला पहाटे ५ वाजेपर्यंत सिग्नल सुरू 
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक, नळस्टॉप, टिळक चौक, पूरम चौक, खंडोजीबाबा चौक, ज्ञानेश्‍वर पादुका चौक, पुणे वेधशाळा, शाहीर अमर शेख चौक, जेधे चौक, नामदार गोखले चौक (गुडलक), 
झाशी राणी चौक, जहाँगीर रुग्णालय चौक, सेव्हन 
लव्हज, सावरकर पुतळा, खान्या मारुती, मार्केट यार्ड, सिंहगड रस्ता जंक्‍शन, एबीसी, गोल्फ क्‍लब, बोपोडी चौक, डायस प्लॉट, राजाराम पूल जंक्‍शन, नेहरू मेमोरिअल चौक, शास्त्रीनगर, शादलबाबा चौक, केशवनगर मुंढवा, कोरेगाव पार्क जंक्‍शन, चर्च चौक.

Web Title: Thirty First Celebration Transport Changes