तुमचे वय ३० पूर्ण आहे; चला तर मग लस घ्यायला

पुणे शहरात आजपासून (ता. १९) ३० ते ४४ वयोगटातील तरुणांसाठी १५ ठिकाणी लसीकरण सुरू करण्यात आले.
Vaccination
VaccinationSakal

पुणे - अपुऱ्या लस पुरवठ्यामुळे (Vaccine Supply) १८ ते ४४ वयोगटातील तरुणांना (Youth) कोव्हीशील्ड लस (Covishield Vaccine) उपलब्ध होत नव्हती. मात्र, आता आजपासून (ता. १९) शहरात ३० ते ४४ वयोगटातील तरुणांसाठी १५ ठिकाणी लसीकरण (Vaccination) सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल (Rubal Agarwal) यांनी दिली. (Thirty to 44 Age Group Youth Corona Vaccination Start in Pune)

केंद्र सरकारने १ मे पासून १८ ते ४४ वयोगटासाठी लसीकरण सुरू करण्याचा निर्णय घेतला. ही लस राज्य सरकारकडून येणे अपेक्षीत होते. मात्र, लसीचे उत्पादन, त्याच्या पुरवठ्यातील गोंधळामुळे लस उपलब्ध होत नव्हती. त्यामुळे सरकारने या वयोगटातील लसीकरण काही काळासाठी बंद करण्याचा निर्णय घेतला होता. याच काळात विद्यार्थी परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा फटका बसल्याने शासनाच्या मान्यतेने शहरात दीड हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना कोव्हीशील्ड लस देण्यात आली. मात्र, जे १८ ते ४४ या वयोगटातील नागरिक नोकरी, व्यवसायानिमित्त बाहेर पडत आहेत अशांना मोफत लस मिळत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात होती. तर अनेकांनी १ हजार रुपये मोजून खासगी रुग्णालयात लस घेतली. मात्र, अद्यापही या गटातील बहुतांश जण लसीकरणापासून वंचित आहेत.

Vaccination
पुणे नाशिक महामार्गावर अपघात: पती, पत्नीसह मुलाचा दुर्दैवी मृत्यू

पुणे महापालिकेने यापार्श्‍वभूमीवर आता ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांना लस देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी महापालिकेच्या १५ रुग्णालयांमध्ये याची व्यवस्था करण्यात आली आहे.

रुबल अग्रवाल म्हणाल्या, महापालिकेच्या १५ रुग्णालयांमध्ये शनिवारपासून ३० वर्षांपुढील नागरिकांचे लसीकरण केले जाणार आहे. यामध्ये ६० टक्के लस ही आॅनलाइन बुकींगद्वारे उपलब्ध असेल. तर थेट केंद्रावर जाणाऱ्या नागरिकांसाठी ४० टक्के लस उपलब्ध असेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com