शिरोळे, काकडे यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 ऑगस्ट 2018

पुणे : महाराष्ट्र शांत ठेवायचा असेल, तर मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या पूर्ण कराव्यात. मराठा आरक्षणाबाबत केवळ घोषणा न करता ठोस कृती करावी, असा इशारा देत मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शहरातील खासदारांच्या घरासमोर आणि कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. या वेळी खासदार अनिल शिरोळे आणि खासदार संजय काकडे यांनी आपण आरक्षणाच्या बाजूनेच असून, सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. 

मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शहरातील लोकप्रतिनिधींच्या घरासमोर आंदोलन करण्यात येत आहे. गेल्या दोन दिवसांपासून पालकमंत्री गिरीश बापट, राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्यासह अन्य आमदारांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. तर, शनिवारी खासदार शिरोळे यांच्या शिवाजीनगर येथील घरासमोर आणि खासदार काकडे यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. त्यात विकास पासलकर, राजेंद्र कोंढरे, शांताराम कुंजीर, रघुनाथ चित्रे-पाटील, बाळासाहेब आमराळे, तुषार काकडे, प्रशांत धुमाळ आदी सहभागी झाले होते. 

शिरोळे म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार मराठा आरक्षणाच्या निर्णयासाठी प्रयत्न करीत आहे.'' 

काकडे यांनी आंदोलनकर्त्यांमध्येच सहभागी होत मी आरक्षणाच्या मागणीसाठी आपल्यासोबत आहे आणि पुढेही कायम राहीन. आंदोलकर्त्यांनी जाळपोळ किंवा आत्महत्या करू नये, असे आवाहन केले. 

Web Title: Thiya agitation Shirole, Kaka's house