बारामतीत ठिय्या आंदोलन

मिलिंद संगई
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

बारामती शहर - भारतीय संविधानाच्या पवित्र प्रतीची दिल्लीत जाळपोळ केल्याच्या निषेधार्थ आज बारामतीत ठिय्या आंदोलन केले गेले. सर्व समाजबांधवांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून भिगवण चौकापर्यंत मोर्चा काढून या घटनेचा निषेध करण्यात आला. नगरपालिकेसमोर आज सकाळपासूनच समाजबांधवांनी ठिय्या आंदोलन केले. या प्रसंगी समाजातील अनेक मान्यवरांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला. अशा प्रवृत्तींना या पुढील काळात थारा दिला जाणार नाही असा इशारा या वेळी देण्यात आला.

बारामती शहर - भारतीय संविधानाच्या पवित्र प्रतीची दिल्लीत जाळपोळ केल्याच्या निषेधार्थ आज बारामतीत ठिय्या आंदोलन केले गेले. सर्व समाजबांधवांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून भिगवण चौकापर्यंत मोर्चा काढून या घटनेचा निषेध करण्यात आला. नगरपालिकेसमोर आज सकाळपासूनच समाजबांधवांनी ठिय्या आंदोलन केले. या प्रसंगी समाजातील अनेक मान्यवरांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला. अशा प्रवृत्तींना या पुढील काळात थारा दिला जाणार नाही असा इशारा या वेळी देण्यात आला. वारंवार अशा घटनांमुळे अन्याय सहन करण्याची शक्ती आता संपली असून या पुढील काळात अशा घटना घडल्या तर त्याला योग्य उत्तर दिले जाईल, असा इशाराही या वेळी विविध वक्त्यांनी दिला. 

दरम्यान पंढरपूर येथे लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याच्या प्रकाराचाही आज सर्वांनीच निषेध केला. श्रीगोंदा येथील घईपतवाडी येथेही महिलेवर बलात्कार करुन तिचा खून करणा-यांना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी बारामतीकरांच्या वतीने केली गेली. या संदर्भात पोलिस निरिक्षकांना पत्र देत या घटनेचा आज निषेध केला गेला. 

संविधानाची प्रत जाळणा-यांविरुध्द देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, जेणेकरुन भविष्यात असे धाडस कोणी करणार नाही, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

Web Title: Thiyya aandolan in baramati