लवळे रस्त्यासाठी ग्रामस्थांचे पुण्यात ठिय्या आंदोलन                  

धोंडिबा कुंभार
शनिवार, 4 ऑगस्ट 2018

 पिरंगुट : मुळशी तालुका राष्ट्रवादी कॅांग्रेसचा सामाजिक न्याय विभाग व लवळे (ता.मुळशी) येथील ग्रामस्थांनी लवळे फाटा ते नांदे रस्त्याच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी पुणे येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर  ठिय्या आंदोलन केले. यावेळी सार्वजनिक बांधकामाच्या विरोधात घोषणा देऊन  निषेध व्यक्त करण्यात आला. येथील खराब रस्त्यामुळे पीएमपीएलची बस सेवा बंद करणार असल्याने या आंदोलनात विद्यार्थी , कामगार तसेच शेतकरीही सामील झाले होते.

याबाबत पुणे येथील बांधकाम विभागाचे अभियंता एस.ई.राहाणे यांना दिनांक २४ जुलै रोजी आंदोलनाचे पत्र दिले होते पण तरीदेखील राहाणे या आंदोलनस्थळी उपस्थित न राहिल्याने आंदोलकांनी संताप व्यक्त केला. सुमारे दोन तास ठिय्या आंदोलन केल्यानंतर  तेथील साहाय्यक अभियंता यांनी या रस्ता मंजुरीबाबतची माहिती दिली.  पावसाळा संपल्यावर या रस्त्याचे काम सुरु होणार असल्याचे सांगितले.  ज्या कंपनीला काम दिले आहे त्याच कंपनीकडून म्हणजेच  रोडवेज सोलुशन इंडीया कंपनी येत्या आठवडाभरात रस्ता दुरुस्ती करेल असे  आश्वासन दिले. याबाबत राहाणे यांचेशी संपर्क केला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. 

आंदोलनात जिल्हा परिषद सदस्य शंकर मांडेकर, राष्ट्रवादी कॅांग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील चांदेरे ,सामाजिक न्याय विभागाचे तालुका अध्यक्ष भाऊ केदारी, अॅड. उत्तमराव ढोरे ,  लवळे गावच्या सरपंच स्वाती गायकवाड , माजी सरपंच वैशाली सातव , विद्या क्षीरसागर , राणी आल्हाट,  माजी सरपंच , संजय सातव, गणेश शितोळे  ,रविंद्र शितोळे,  अजित शितोळे, अजित चांदिलकर ,  अर्जुन दुधाळे, दत्तात्रय मोरे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. 
     
आंदोलनात लवळेफाटामार्गे  पुणे येथील महाविद्यालयात इयत्ता अकरावीमध्ये शिकत असणारी ही विद्यार्थीनी सामील झाली होती. अंजलीने संबंधित बांधकाम विभागाच्या प्रतिनिधीशी सडेतोड संवाद साधला. अंजली  म्हणाली , " साहेब , आम्ही खेड्यात जन्म घेऊन गुन्हा केला काय , रस्त्यामुळे आमची बस बंद होणार आहे. मग आम्ही शिक्षण घ्यायचेच नाही काय. आमचा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करावा व आमच्यावर पुन्हा आंदोलनाची वेळ आणू नये. "अंजलीच्या या प्रश्नांमुळे  संबंधित प्रतिनिधी काही क्षण निरुत्तर झाले . ते अंजलीला म्हणाले , " बाळा , आता रस्ता खूपच चांगला होणार आहे. तुम्हाला कोणालाही त्याचा त्रास होणार नाही."  या उत्तराने आंदोलकांनी टाळ्यांचा कडकडाट करीत अंजलीला दाद दिली.  
 
Web Title: thiyya agitation for lavle road in pune