लामजेवाडीत मातीला भिडले विद्यार्थ्यांचे हजारो हात 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 एप्रिल 2018

भवानीनगर - बारमाही दुष्काळाचे चटके सोसलेल्या लामजेवाडीत रविवारी सकाळीच ढोल, ताशे वाजले... रणरणत्या उन्हात एरवी निर्जन असलेल्या माळरानावर शेकडो कृषिकन्यांचे गट मैलोन्‌मैल पसरले. आणि हजारो हात मातीला भिडले. श्रमदानाच्या कामांनी शिवारातल्या झाडाझुडपांनाही यंदाच्या पावसाळ्यात शिवार पाण्यानं गच्च फुगलं असा विश्वास आला..! 

वॉटर कप स्पर्धेत भाग घेतलेल्या लामजेवाडीत रविवारी ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टमधील सातशेहून अधिक विद्यार्थी, विद्यार्थिनी व पाचशेहून अधिक शिक्षक, प्राध्यापक, ग्रामस्थांनी श्रमदान करीत 45 दिवसांत करावयाची बांधबंदिस्ती, खोदकामाची कामे तीन तासांत पूर्ण केली. दर आठवड्याला एक दुष्काळी गाव निवडून तिथे हजारो जणांनी एकाच वेळी श्रमदान करण्याची ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदा पवार यांनी आखलेली योजना चांगलीच यशस्वी होताना दिसत आहे.

आज लामजेवाडीत याचा प्रत्यय आला. भल्या सकाळीच शारदानगरहून आलेल्या अनेक बस आल्या. यामुळे गाव जागे झाले. शिवाराच्या दिशेने सारेच ग्रामस्थ धावले. ग्रामस्थ व विद्यार्थ्यांच्या एकत्रित श्रमदानामुळे लामजेवाडीच्या टेकड्यांवर व शिवारांचे बांध फुगून मोठे झाले. याचा पावसाळ्यात पाणी अडविण्या व जिरविण्यासाठी मोठा फायदा होणार आहे. 

Web Title: Thousands of hands-on students climbed the soil in Lamjewadi