तरुणीला एॅसिड टाकून मारण्याची धमकी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 जून 2018

पुणे : प्रेमास नकार देणाऱ्या तरुणीस लग्न न केल्यास एॅसिड टाकुन मारण्याची भर रस्त्यात धमकी देणाऱ्याविरुद्ध हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन माहुरे असे मुलीला धमकी देणाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी 23 वर्षीय मुलीने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यावरुन पोलिसांनी माहुरे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माहुरे व फिर्यादी तरुणी अमरावतीमधील एकाच गावातील आहे. त्यामुळे दोघांची तोंडओळख होती. तरुणी उच्चशिक्षीत असून ती एका बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये उच्च पदावर कार्यरत आहे. 

माहूरे याने पुण्यात आल्यानंतर तरुणीचा मोबाईल क्रमांक मिळवून तिच्याशी सतत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. माहुरे हा संबंधीत मुलीवर एकतर्फी प्रेम करु लागला. मुलीशी बोलण्यासाठी तो सातत्याने तिचा पाठलाग करत असे. त्याने तिच्याशी लग्नाचीही बोलणी करण्याचा प्रयत्न केला. गुरुवारी रात्री संबंधीत तरुणी काम संपल्यानंतर घरी जात होती. त्यावेळी माहुरे हा तिचा पाठलाग करत होता. मुलगी सिझन मॉल परिसरात आली असताना त्याने तिला अडवून 'मला तु आवडतेस. मला तुझ्याशी लग्न करायचे आहे. तु लग्नास नकार दिला, तर तुझ्यावर ऍसीड फेकून तुझा जीव घेईल' अशा शब्दात तिला धमकाविले. या प्रकरणानंतर घाबरलेल्या तरुणीने थेट पोलिस ठाण्यात धाव घेऊन माहुरे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Web Title: Threat of acid attack by the woman