आंबेगाव तालुक्‍यात असा वाढतोय कोरोनाचा धोका 

lockdown.
lockdown.

मंचर (पुणे) : आंबेगाव तालुक्‍यात श्रीक्षेत्र वडगाव काशिंबेग व पिंगळवाडी (लांडेवाडी) या दोन गावात दोन रुग्णांचा कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे तालुक्‍यात कोरोना लागण झालेल्या रुग्णांची संख्या आठ झाली आहे. विशेष म्हणजे दोन्ही व्यक्ती मुंबईहून आलेले आहेत. रुग्ण संख्या वाढत असल्याने प्रशासन व गावकऱ्यांचे चिंतेत भर पडली आहे. 

आज रात्री प्रयोगशाळेतील अहवाल प्राप्त झाल्यानंतर प्रशासनाची यंत्रणा या दोन्ही गावात ताबडतोब रात्री पोहोचली. तहसीलदार रमा जोशी, आंबेगाव तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, तालुका आरोग्य अधिकारी सुरेश ढेकळे, पोलिस निरीक्षक कृष्णदेव खराडे, सहायक पोलिस निरीक्षक प्रदीप पवार यांनी गावकऱ्यांची संपर्क साधून गावच्या सीमा बंद करण्याची कार्यवाही सुरू केली होती. सर्व गावकऱ्यांनी घरातच थांबावे, असे आव्हान ग्रामपंचायत व प्रशासनाने केले आहे. या दोन्ही व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या अन्य व्यक्तींना भीमाशंकर आयुर्वेदिक हॉस्पिटलमध्ये किंवा त्यांच्या राहत्या घरातच होम क्वारंटाइन केले जाणार असल्याचे सांगण्यात आले. 

दरम्यान, अवसरी खुर्द येथे ते बुधवार ते शनिवार (ता. 30) या कालावधीत गावात पूर्णपणे लॉकडाउन प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. व्यापारी व ग्राहक यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती आंबेगाव तालुका पंचायत समितीचे सदस्य संतोष भोर यांनी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com