पीएफ कार्यालयासाठी  ‘एचए’ची तीन एकर जागा

पीएफ कार्यालयासाठी  ‘एचए’ची तीन एकर जागा

पिंपरी - पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये कार्यरत असणारी भविष्यनिर्वाह निधी (पीएफ) कार्यालये लवकरच हक्‍काच्या जागेमध्ये येणार आहेत. त्यासाठी हिंदुस्तान अँटिबायोटिक्‍स (एचए) कंपनीची साडेतीन एकर जागा घेण्यात येईल. येत्या दोन वर्षांमध्ये या ठिकाणी ही कार्यालये आणि कर्मचाऱ्यांचे निवास उभे राहतील. लवकरच याचे भूमिपूजन होणार आहे.

सध्या पीएफची कार्यालये पुण्यामध्ये गोळीबार मैदान आणि कॅम्पमध्ये, तर आकुर्डीमधील प्राधिकरणात कार्यालये आहेत. आकुर्डीतील कार्यालय दहा हजार वर्गफूट जागेमध्ये आहे. हिंदुस्तान अँटिबायोटिक्‍स कंपनीकडून जागा घेऊन त्या ठिकाणी कार्यालय उभारण्यास केंद्रीय समितीने मान्यता दिली आहे. अनेक दिवसांपासून या प्रस्तावाबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू होता, अशी माहिती आकुर्डीतील पीएफचे विभागीय आयुक्‍त अमिताभ प्रकाश यांनी दिली. या समितीचे सदस्य पी. बाणासुरे यांनीदेखील विषय लावून धरला होता. 

एचएकडील जमीन खरेदीसाठी पीएफला ४२ कोटी रुपये लागणार आहेत. विभागाच्या बजेटमध्ये हा निधी राखीव ठेवण्याची पूर्तता करण्यात येणार आहे. साडेतीन एकर जागेमध्ये ४० हजार वर्गफुटांच्या जागेमध्ये तीन कार्यालये असतील. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com