जादा दर आकारणीबद्दल तीन रुग्णवाहिका ताब्यात 

ambulance
ambulance

पुणे - प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) ठरवून दिलेल्या दरांपेक्षा जादा दराने रुग्णांच्या नातेवाइकांकडून आकारणी केल्यामुळे तीन रुग्णवाहिका गुरुवारी ताब्यात घेतल्या. 

कोरोनाच्या काळात रुग्णवाहिकांनी रुग्णांच्या नातेवाइकांकडून जादा दराने आकारणी करू नये, यासाठी त्यांचे दर निश्‍चित करण्यात आले आहेत. मात्र, त्याचे उल्लंघन झाल्याचे दिसून आल्यामुळे या रुग्णवाहिका ताब्यात घेतल्या आहेत. संबंधित रुग्णांच्या नातेवाइकांना शुक्रवारी बोलविण्यात येणार आहे. त्यांच्याकडे सखोल चौकशी करून पुढील कारवाई करण्यात येईल, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी सांगितले. पुढील कारवाई होईपर्यंत या रुग्णवाहिका आरटीओच्या आवारातच राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पहिल्या दोन तासांसाठी अथवा 25 किलोमीटरसाठी वाहनाच्या प्रकारानुसार 500, 600 आणि 900 रुपये आकारता येतील. तर, त्या पुढील अंतरासाठी त्यांना 11, 12 आणि 13 रुपये प्रती किलोमीटर दराने आकारणी करता येणार आहे. प्रती तास प्रतिक्षेसाठी त्यांना 100, 125 आणि 150 रुपये आकारणी करता येईल, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. सार्वजनिक ट्रस्ट, मंडळे आणि खासगी रुग्णालयांच्या रुग्णवाहिकांसाठीही याच दराने आकारणी करणे बंधनकारक आहे, असेही त्यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com