court
court

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी तिघांचे अर्ज फेटाळले

पुणेः माओवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून पुणे पोलिसांनी कारवाई केलेल्या व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार नजरकैदेत ठेवण्यात आलेल्या मानवाधिकार कार्यकर्त्यांपैकी ऍड. सुधा भारद्वाज, ऍड. अरुण फरेरा, वेरनॉन गोंसालवीस यांचा जामीन अर्ज आज (शुक्रवार) सत्र न्यायाधीश के. डी. वडणे यांनी फेटाळून लावला.

सत्र न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात त्वरित अपील करणार असल्याचे बचाव पक्षाच्या वतीने ऍड. राहुल देशमुख यांनी सांगितले. तिघांचा जामीन अर्ज फेटाळल्याने उच्च न्यायालयात अपील करून त्याबाबतचा निर्णय येईपर्यंत नजरकैदेत वाढ करावी, असा विनंती अर्ज बचाव पक्षाने न्यायालयाकडे केला आहे. त्यावर सरकारी वकील उजवला पवार आजच दुपारी 3 नंतर युक्तिवाद करणार आहेत. सत्र न्यायाधीश आजच या नजरकैदेच्या मुदतवाढ अर्जाबाबत निर्णय देतील.

मुदतवाढीचा बचाव पक्षाचा अर्ज सत्र न्यायालयाने जर फेटाळून लावला तर कोणत्याही क्षणी मानवाधिकार कार्यकर्त्यांना अटक होण्याची शक्यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com