पुण्यात प्रवाशांना लुटणारी टोळी जेरबंद

संदीप जगदाळे
शनिवार, 22 एप्रिल 2017

हडपसर (पुणे)- फोर व्हिलर गाडीत लिफ्ट देवून व चाकूचा धाक दाखवून प्रवाशांना लुटणा-या टोळीतील तिघांना हडपसर पोलिसांनी आज (शनिवार) अटक केली. एक आरोपी फरार आहे. आरोपींकडून चोरीची आंगठी, मोबाईल व गुन्हयात वापरलेली इंडिका मोटार पोलिसांनी जप्त केली आहे.

हडपसर (पुणे)- फोर व्हिलर गाडीत लिफ्ट देवून व चाकूचा धाक दाखवून प्रवाशांना लुटणा-या टोळीतील तिघांना हडपसर पोलिसांनी आज (शनिवार) अटक केली. एक आरोपी फरार आहे. आरोपींकडून चोरीची आंगठी, मोबाईल व गुन्हयात वापरलेली इंडिका मोटार पोलिसांनी जप्त केली आहे.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये संतोष गेनु तापकीर (वय 41, रा, च-होली बुद्रूक, ता. हवेली), गिरीराज चुंबकलाल चौधरी (वय 27, रा. आळंदी देवाची), ज्ञानेश्र्वर आश्रोबा देवकाते (वय 21, रा. परळी वैजनाथ, बीड) या तिघांचा समावेश आहे. बंटी ठाकूर (वय 20, रा. आळंदी, ता. हवेली) हा फरार आहे. याबाबत वेदराज हिरालाल रावल (वय 32, रा, ससाणेनगर हडपसर) यांनी तक्रार दिली आहे.

हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक विष्णू पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, सातववाडी येथे आरोपींनी रावल यांना निरेला जाण्यासाठी पहाटे पाच वाजता लिफ्ट दिली. आरोपींनी मद्य प्राशन केले होते. दिवेघाटात गेल्यानंतर आरोपींनी चाकूचा धाक दाखवून रावल यांची सोन्याची आंगठी, मोबाईल व दोनशे वीस रूपये लूटले. त्यानंतर दिवेघाटात त्यांना सोडून चोरटे फरार झाले. निळ्या रंगाची इंटीका गाडी एवढया एकाच धाग्यावरून तपास करून सहाय्यक पोलिस निरिक्षक संदीप देशमाने, विनोद शिवले, प्रताप गायकवाड, अमित कांबळे, नितीन मुंडे, अकबर शेख यांनी सापळा रचून आरोपींना अटक केली व त्यांच्याकडील चोरीचा माल जप्त केला.

चोरलेले मोबाईल विविध भागातील असून, त्यांच्याकडून प्रवाशांना लूटल्याचे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

Web Title: three areested in pune