पुण्यात प्रवाशाला लुटणाऱ्या रिक्षाचालकासह तिघांना अटक 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 नोव्हेंबर 2019

पुणे : रिक्षात बसलेल्या प्रवाशाला अन्य साथीदारांच्या मदतीने भरदिवसा लुटणाऱ्या रिक्षाचालकासह तिघांना बंडगार्डन पोलिसांनी अटक केली. ही घटना रविवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ससून रुग्णालयासमोर घडली. 

रिक्षाचालक कपिल यशवंत खिलारे (वय 43, रा. दत्तवाडी), विजय फक्कड ढावरे (वय 31, रा. लक्ष्मी नगर, दत्तवाडी) आणि अब्दुलरझाक हुसेन भोला (वय 22, रा. बाबाखान वस्ती, वारजे) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी मुळशी तालुक्‍यातील वरसगाव येथे राहणाऱ्या 22 वर्षीय तरुणाने बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुण रविवारी दुपारी स्वारगेट येथून पुणे स्टेशन येथे निघाला होता. त्यावेळी रिक्षाचालक खिलारे फिर्यादीस पुणे स्टेशनपर्यंत जाण्यासाठी वीस रूपये घेतो असे सांगितले. त्यानुसार फिर्यादी पैसे देण्यास तयार झाले. फिर्यादी रिक्षामध्ये बसल्यानंतर काही अंतरावरच ढावरे व हुसेन हे दोघेजणही रिक्षामध्ये बसले. रिक्षा दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ससून रुग्णालयासमोर आली. त्यावेळी पाठीमागे बसलेल्या दोघांनी फिर्यादीस दमदाटी व शिवीगाळ करीत त्यांच्या खिशातील पैसे काढून घेतले. या प्रकारानंतर फिर्यादीने पोलिसांकडे धाव घेतली.

बंडगार्डन पोलिसांकडे फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरणाद्वारे रिक्षाचा क्रमांक शोधून रिक्षाचालकाचा तपास केला. त्यानंतर रिक्षाचालकासह त्याच्या दोन साथीदारांनाही अटक केली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three arrested with autorickshaw Driver for robbing passenger in pune