पिंपरीत तरुणाला बेदम मारहाण; तिघांना अटक 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 नोव्हेंबर 2019

​काळेवाडीतील तापकीर मळा येथील दोस्ती हॉटेल समोर फिर्यादीची पानटपरी आहे. शनिवारी (ता.9) सकाळी साडेअकराच्या सुमारास फिर्यादी व त्यांचा भाऊ रईस खान टपरीमध्ये होते. त्यावेळी त्याठिकाणी आलेल्या आरोपींनी टपरीमधून सिगारेट घेतली. मात्र, पैसे न देता जात असताना फिर्यादीने त्यांच्याकडे पैसे मागितले असता आरोपींनी त्यांना शिवीगाळ केली. तसेच हाताने व दगडाने मारहाण केली. 

पिंपरी : पानटपरीमधून सिगारेट घेतल्यानंतर पैसे मागितल्याच्या कारणावरुन तिघांनी तरुणाला बेदम मारहाण केली. ही घटना काळेवाडी येथे घडली. याप्रकरणी वाकड पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. 

निजाम अशरफअली खान (वय 20, रा. इंडियन कॉलनी, नढेनगर, काळेवाडी, वाकड) या तरुणाने फिर्याद दिली आहे. त्यानुसार रोहित उर्फ डोंग्या प्रभाकर वाघमारे (वय 19, रा. शिवकृपा कॉलनी, नढेनगर, काळेवाडी), अजिंक्‍य उर्फ पवन शाम देशमुख (वय 21, रा. राजवाडे कॉलनी, काळेवाडी), विकी राजू पठारे (वय 19, रा. सुर्यकिरण कॉलनी, ज्योतिबानगर, काळेवाडी) यांना अटक केली आहे.

काळेवाडीतील तापकीर मळा येथील दोस्ती हॉटेल समोर फिर्यादीची पानटपरी आहे. शनिवारी (ता.9) सकाळी साडेअकराच्या सुमारास फिर्यादी व त्यांचा भाऊ रईस खान टपरीमध्ये होते. त्यावेळी त्याठिकाणी आलेल्या आरोपींनी टपरीमधून सिगारेट घेतली. मात्र, पैसे न देता जात असताना फिर्यादीने त्यांच्याकडे पैसे मागितले असता आरोपींनी त्यांना शिवीगाळ केली. तसेच हाताने व दगडाने मारहाण केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three arrested for beating boy in Pimpri

टॅग्स