महागड्या बुलेट चोरणाऱ्या चोरट्यांना अटक

शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून महागड्या बुलेटसह दुचाक्‍यांची चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकाने अटक केली.
pune
punesakal

पुणे : शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून महागड्या बुलेटसह दुचाक्‍यांची चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना (stealing expensive bullets) गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकाने अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून 4 बुलेटसह 15 दुचाकी असा पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. मारूती माधव गिरी (वय 22, रा. साडेसतरा नळी, हडपसर,मुळ नांदगाव, परभणी), उमेश भारत चौगुले ( वय 22, मांजरी बुद्रुक, मूळ रा.मंगळवेढा, सोलापुर) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकाने (क्रमांक दोन) मुंढव्यातील केशवनगर येथून दोघांना संशयाच्या कारणावरुन ताब्यात घेतले होते. (Three arrested for stealing expensive bullets)

त्यांच्याकडे असलेल्या दुचाकीच्या कागदपत्रांबाबत पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली. तेव्हा, संबंधीत दुचाकी चोरीची असल्याचे पोलिसांच्या चौकशीत आरोपींनी सांगितले. त्यानंतर पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर आरोपींनी त्यांच्या तिसऱ्या साथीदाराच्या मदतीने वाहन चोरीचे गुन्हे केल्याची माहिती दिली. आरोपींनी आत्तापर्यंत हडपसरमध्ये 6, रांजणगाव एमआयडीसी येथे दोन, चंदननगर, लोणीकंद, सिंहगड रोड, बारामती शहर या पोलिस ठाण्यांच्या हद्दीमध्ये प्रत्येकी एक असे 12 गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे.

pune
परदेशात नोकरी मिळवून देण्याच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्या महिलेला अटक

पोलिसांनी त्यांच्याकडून पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनिल पंधरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक विवेक पडवी, पोलिस उपनिरीक्षक गुंगा जगताप, उदय काळभोर, राजेश अभंगे, दिनकर लोखंडे, विनायक रामाणे, शाकीर खान यांच्या पथकाने हि कामगिरी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com