पुणे : भरधाव कारच्या धडकेत दोन 12 वर्षीय मुलांसह तिघांचा मृत्यू 

Three children including two 12 year old children were killed in a car crash in pune
Three children including two 12 year old children were killed in a car crash in pune

पुणे : मुलगा व त्याच्या मित्राला खाऊ देऊन तिघेजण दुचाकीवर घरी परत येताना भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजता विमाननगर परिसरात घडली. या अपघातातील मृतांमध्ये बाप-लेकाचा मसमावेश आहे. विमाननगर पोलिसांनी कारचालकास अटक केली. 

नरसय्या येरय्या शेट्टी (वय 37, रा. कलवड वस्ती, लोहगाव), त्यांचा मुलगा यशवंत नरसय्या शेट्टी (वय 12) व यशवंतचा मित्र अशफाक सलीम सय्यद (वय 12) अशी या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तिघांची नावे आहेत. याप्रकरणी मल्याद्री शेट्टी (वय 40, रा. लोहगाव) यांनी विमाननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी प्रमोद नानाजीराव कदम (वय 50, रा.येरवडा) असे अटक केलेल्या कारचालकाचे नाव आहे. 

नरसय्या शेट्टी हे दक्षिण भारतामध्ये राहतात. ते त्यांचा भाऊ फिर्यादी मल्याद्री शेट्टी यांना भेटण्यासाठी मुलासमवेत काही दिवसांपुर्वी पुण्याला आले होते. दरम्यान नरसय्या शेट्टी, त्यांचा मुलगा यशवंत व त्याचा मित्र अशफाक बुधवारी (एमएच 02/बीसी 8907) त्यांच्या दुचाकीवर ट्रिपलसीट घेऊन गेले होते. यशवंतला खाऊ घ्यायचा होता, त्यामुळे शेट्टी यांनी यशवंतचा मित्र अशफाकलाही आपल्यासमवेत घेतले होते. त्यावेळी शेट्टी यांनी हेल्मेट परिधान केले नव्हते. खाऊ घेतल्यानंतर शेट्टी हे दोघांना बरोबर घेऊन लोहगावमधील कलवडवस्ती येथील त्यांच्या घरी माघारी परत येत होते. त्यावेळी समोरून भरधाव आलेल्या कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यामुळे तिघेजण गंभीर जखमी झाले. त्यामध्ये शेट्टी व त्यांचा मुलगा यशवंत यांच्या डोक्‍यास गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर अशफाक यास उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. 

दरम्यान, अपघातानंतर कारचालक कदम याने जखमींनी रुग्णालयात नेण्यासाठी मदत न करता, त्याने तेथून पळ काढला. पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरणाद्वारे त्याचा शोध घेऊन त्यास अटक केली. आरोपी कदम हा एका खासगी कंपनीत मार्केटिंग एक्‍झिक्‍युटिव्ह या पदावर काम करत आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) बळवंत मांगडे करत आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com