स्कूल बसच्या अपघातात तीन मुले जखमी

स्कूल बसच्या अपघातात तीन मुले जखमी

कात्रज - कात्रज देहूरोड बाह्यवळण मार्गाच्या सेवा रस्त्याने दुपारी शाळेकडे निघालेली स्कूल बस आंबेगाव बुद्रुकच्या हद्दीत पलटी होऊन झालेल्या अपघातात तीन मुले किरकोळ जखमी झाली. ब्रेक निकामी झालेली बस चालकाने प्रसंगावधान राखून मुख्य रस्त्याच्या भरावावर चढविल्यामुळे मोठी दुर्घटना आणि जीवितहानी टळली.

  आंबेगाव बुद्रुक येथील पोद्दार इंटरनॅशनल स्कूलची बस साडेबाराच्या शाळेसाठी तिसरीच्या पंधरा विद्यार्थ्यांना घेऊन बाह्यवळण मार्ग सोडून सर्व्हिस रस्त्याने शाळेकडे येत होती. उताराच्या रस्त्याने शाळेच्या दिशेने बस निघाली असता अचानक ब्रेक निकामी झाल्याचे चालक आरिफ शेख यांना जाणवले. प्रसंगावधान राखत त्यांनी बस डाव्या बाजूच्या भरावावर चढवली. बस तिरकी होऊन रस्त्यावर पलटी झाली. केवळ शंभर फूट अंतरावर असलेल्या पोद्दार स्कूलमधील शिक्षक, कर्मचारी व पालक घटनास्थळी धावले. दरवाजा व खिडक्‍यातून विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढले. किरकोळ जखमी झालेल्यांवर प्रथमोपचार केले. घटनास्थळी आलेले गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक विष्णू ताम्हाने यांनी खबरदारी म्हणून जखमी झालेल्या गार्गी राहुल कारळे, श्‍लोका योगेश सावंत, अर्णव शेभडे यांना नऱ्हे येथील खासगी रुग्णालयात नेऊन तपासणी करून पालकांकडे सुपूर्त केले. बस पलटी झाल्यानंतर मार्गावर एकच गोंधळ झाला. घटनास्थळी आलेले भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे मार्शल संदीप काळेहाणे व स्वप्नील शर्मा व वाहतूक पोलिसांनी क्रेनच्या साह्याने बस बाजूला घेतल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com