तीन गुन्हेगार तडीपार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 मे 2018

येरवडा - विश्रांतवाडीतील दोन, तर येरवड्यातील एक रेकॉर्डवरील गुन्हेगाराला परिमंडल चारचे उपायुक्त दीपक साकोरे यांनी पुणे शहर व जिल्ह्यातून तडीपार केले आहे. गुंड्या ऊर्फ सूरज मनोहर माचरेकर (वय 46, रा. भीमनगर), लता रमेश मोहिते (वय 45, रा. विश्रांतवाडी), रवींद्र दशरथ कांबळे (वय 24, रा. लक्ष्मीनगर) या गुन्हेगारांचा यात समावेश आहे.

विश्रांतवाडी येथे गेल्या महिन्यात गुंड्याच्या घरावर पोलिसांनी छापा घालून अमली पदार्थ जप्त केले होते. तो मटका, जुगार चालवत असल्यामुळे पोलिसांनी त्याच्या मुसक्‍या आवळल्या होत्या. कारवाईदरम्यान तो पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरारी झाला होता. त्यानंतर त्याने उच्च न्यायालयातून जामीन मंजूर करून आणला होता; मात्र त्याला एक वर्षासाठी तडीपारीचा आदेश दिला. लता माहिते यासुद्धा राजकीय आशीर्वादामुळे गेली अनेक वर्षे मटका व जुगार चालवत होत्या. त्यांना सहा महिन्यांसाठी तडीपार केले असून, शिंदे रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्यामुळे त्याला दोन वर्षांसाठी तडीपार केले असून, गेल्या वर्षभरात परिमंडल चारमधील 32 जणांना तडीपार केल्याची माहिती साकोरे यांनी दिली.

Web Title: three criminal tadipar crime