सांडपाण्याने भरतील तीन धरणे! 

योगीराज प्रभुणे
शनिवार, 12 मे 2018

पुणे - लोकसंख्या वाढली... औद्योगीकरण वाढले... पाण्याची मागणी वाढली... पण वापरलेल्या पाण्यावर प्रक्रिया करण्याची यंत्रणा काही सक्षमरीत्या उभी राहू शकलेली नाही. परिणामी, पानशेत, वरसगाव आणि टेमघर ही धरणे काठोकाठ भरतील, इतके सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता आपण दरवर्षी थेट नद्यांमध्ये सोडत आहोत. यातील 85.85 टक्के सांडपाणी तयार होणाऱ्या राज्यातील 27 महापालिकांपैकी केवळ 15 ठिकाणीच सांडपाणी प्रक्रिया केंद्रे आहेत. 

राज्यातून वाहणाऱ्या प्रमुख 49 नद्यांमध्ये 156 ठिकाणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे पाण्याची गुणवत्ता तपासण्यात आली. त्यापैकी 153 ठिकाणी नद्यांच्या पाण्यातील "बायोकेमिकल ऑक्‍सिजन डिमांड' प्रतिलिटर पाण्यात तीन मिलि ग्रॅमपेक्षा जास्त होती. 

सर्वाधिक वाहते सांडपाणी! 
देशात रोज तयार होणाऱ्या 61,754 दशलक्ष लिटर सांडपाण्यापैकी एकट्या महाराष्ट्रातूनच 7,297 दशलक्ष लिटर (देशाच्या 11 टक्के) सांडपाणी तयार होते. त्यापैकी 5,160 दशलक्ष लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया होते. उरलेले जवळपास 27.5 टीएमसी सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट नद्यांमध्ये सोडले जाते. 

वापरलेल्या पाण्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणा गेल्या 30 वर्षांमध्ये प्रभावीपणे उभी राहिली नाही, हे नदी प्रदूषणाचे मूळ आहे. यासाठी आता सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची केंद्रे उभारण्यावर भर दिला जात आहे. 
- आर. एम. भारद्वाज, जल गुणवत्ता व्यवस्थापक, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, नवी दिल्ली. 

महापालिकांच्या अर्थसंकल्पातील 25 टक्के निधी सांडपाणी प्रक्रिया केंद्रासाठी राखीव ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यातून उभ्या राहिलेल्या निधीतून ही केंद्रे उभी करता येतील, यावर आता भर दिला जात आहे. 
- यशवंत सोनटक्के, सहसंचालक (जल), महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ 

सांडपाण्यात सर्वाधिक वाटा महापालिकांचा 
संस्था .......................सांडपाणी सोडण्याचे प्रमाण (सर्व आकडे टक्‍क्‍यांमध्ये) 
महापालिका ........................... 85.62 
नगर परिषद ( वर्ग 1) ............ 2.59 
नगर परिषद ( वर्ग 2) ............. 5.04 
नगर परिषद ( वर्ग 3) ............. 6 
कॅंटोन्मेंट बोर्ड ....................... 0.54 
नगर पंचायत ......................... 0.21 
(स्रोत ः महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ)

Web Title: Three dams filled with sewage