लोणावळा : मतदानासाठी निघालेल्या तिघांवर काळाचा घाला

death.jpg
death.jpg

लोणावळा : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पवना पोलिस चौकीनजीक सोमवारी (ता. २१) पहाटे बसने ट्रकला ठोकरल्याने झालेल्या भीषण अपघातात मतदानासाठी निघालेले साताऱ्याचे तिघे जण मृत्यूमुखी पडले. तर २५ प्रवासी जखमी झाले. जखमींपैकी ८ जणांची प्रकृती गंभीर आहे.

सयाजी पांडुरंग पाटील (वय ६०), संभाजी शिवाजी पाटील (वय ४५, वझोळी, पाटण, जि. सातारा), मोहनकुमार शेट्टी (वय ४२, रा. वांगणी, बदलापूर) अशी मृतांची नावे आहेत.

द्रुतगती मार्गावरील उतार व वळणावर पहाटेच्या सुमारास चालकास डुलकी लागल्याने बसने उभ्या वाहनांना मागून ठोकरल्याने हे दोन्ही अपघात झाले असण्याची शक्यता वाहतूक पोलिसांनी व्यक्त केली. अपघातग्रस्तांवर ओझरडे येथील ट्रामा सेंटर व सोमटने येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com