पीएमपीचे तीन संचालक आमदार 

पीएमपीचे तीन संचालक आमदार 

पुणे - पीएमपीचे तीन संचालक एकाचवेळी आमदार होण्याची घटना पहिल्यांदाच घडली असल्याने आतातरी पीएमपीला अच्छे दिन येणार का, याबाबत औत्सुक्‍य निर्माण झाले आहे. 

पीएमपीच्या संचालक मंडळात दोन्ही महापालिकांचे महापौर, स्थायी समितीचे अध्यक्ष; तसेच महापालिकेतील एक नगरसेवक संचालक म्हणून काम करतात. सध्याच्या संचालक मंडळातील महापौर मुक्ता टिळक, स्थायी समितीचे अध्यक्ष सुनील कांबळे आणि पीएमपीचे संचालक सिद्धार्थ शिरोळे हे तिघेही आमदार म्हणून निवडून आले आहेत. नगरसेवक शिरोळे हे पाच वर्षांसाठी संचालक आहेत; तर टिळक आणि कांबळे हे पदसिद्ध संचालक आहेत. पीएमपीच्या इतिहासात पहिल्यांदाच तीन संचालक आमदार झाले आहेत. पीएमपीच्या अध्यक्षा आणि व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांनी शुक्रवारी तिन्ही आमदारांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. याबाबत टिळक म्हणाल्या, ‘‘पीएमपीमध्ये नव्या बस घेण्याची प्रक्रिया यापूर्वीच सुरू झाली आहे. बसखरेदीबरोबरच आता आगारांचा विकास; तसेच वर्कशॉपबाबतच्या मुद्‌द्‌यासाठी पाठपुरावा अधिक वेगाने केला जाईल.’’ शिरोळे म्हणाले, ‘‘पीएमपीच्या मालमत्तांना अडीच एफएसआय मिळावा, तज्ज्ञ संचालकांची नियुक्ती, आगारांचा विकास आदी प्रस्तावांसाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा केला जाईल; तसेच केंद्र सरकारच्या योजनांतून पीएमपीसाठी जे काही करता येईल, ते करणार असल्याचे गुंडे यांना सांगितले आहे.’’

पीएमपीचे तीन संचालक आमदार झाले आहेत, ही संस्थेसाठी अभिमानाची बाब आहे. या संचालक आमदारांचा पीएमपीच्या सक्षमतेसाठी अधिक उपयोग होईल.
- नयना गुंडे, अध्यक्षा आणि व्यवस्थापकीय संचालक, पीएमपी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com