तीन विद्यमान नगरसेवक आमने-सामने 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 फेब्रुवारी 2017

पुणे - शहराच्या मध्यवर्ती भागात स्थायी समितीचे विद्यमान अध्यक्ष बाळासाहेब बोडके, उपमहापौर मुकारी अलगुडे, विद्यमान नगरसेवक राजू पवार आणि खासदार पुत्र सिद्धार्थ शिरोळे एकाच प्रभागातून निवडणूक लढवीत असल्यामुळे डेक्कन जिमखाना-मॉडेल कॉलनी प्रभागातील लढत चुरशीची झाली आहे. चार सदस्यांच्या प्रभागात भाजपने दोनऐवजी तीन महिला उमेदवार दिल्या आहेत, हेदेखील येथील वेगळेपण आहे. 

बोडके राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून, अलगुडे कॉंग्रेसकडून, पवार शिवसेनेकडून, शिरोळे भारतीय जनता पक्षाकडून, ऍड. चैतन्य दीक्षित महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आणि शेतकरी कामगार पक्षाकडून दया इरकल प्रभागातील खुल्या गटातून निवडणूक लढवीत आहेत.

तीन विद्यमान नगरसेवक एकाच प्रभागात 
समोरासमोर आल्यामुळे आणि खासदार अनिल शिरोळे यांनीही प्रतिष्ठा पणाला लावल्यामुळे हा प्रभाग शहरात चर्चेचा विषय ठरला आहे. उच्चभ्रू, मध्यमवर्गीय, वस्ती विभाग, गावठाण आदी वस्त्यांमुळे समाजातील सर्वच घटकांचे तब्बल 84 हजार मतदार येथे आहेत. त्यामुळे येथे कोणालाही गृहित धरता येत नाही. 

या प्रभागात शिरोळे यांना भाजपची उमेदवारी मिळू नये, असे येथील काही भाजप कार्यकर्त्यांचे म्हणणे होते. परंतु, पक्षाने शिरोळे यांनाच उमेदवारी दिली. बोडके, अलगुडे आपापल्या पक्षात वरिष्ठ सदस्य आहेत. तर पवार स्वगृही परतले आहेत. मनसेने युवा चेहरा दिला असून इरकल हे परिचित नाव शेकापच्या माध्यमातून मतदारांसमोर आले आहे. प्रभात रस्ता, आपटे रस्ता, घोले रस्ता, सेनापती बापट रस्ता, मॉडेल कॉलनी, पांडवनगर, शिवाजीनगर गावठाण, तोफखाना आदी भाग या प्रभागात आहे. 

या प्रभागातील अन्य गटांत राष्ट्रवादीकडून बोडके यांच्यासह हेमलता महाले, प्रशांत सावंत, मंगला पवार, कॉंग्रेसकडून अलगुडे यांच्यासह मयूरी शिंदे, आयेशा सय्यद, नारायण पाटोळे, भाजपकडून शिरोळे यांच्यासह नीलिमा खाडे, प्रा. ज्योत्स्ना एकबोटे, स्वाती लोखंडे, शिवसेनेकडून पवार यांच्यासह अस्मिता शिरोळे, नीता मंजाळकर आणि अरविंद कांबळे तर मनसेकडून दीक्षित यांच्यासह सोनम कुसाळकर, राजेश नायडू आणि विनया दळवी रिंगणात आहेत. 

Web Title: Three existing corporator in pmc election