पुणे-लोणावळा मार्गावर तीन अतिरिक्त लोकल

लोणावळा लोकल रेल्वेने या मार्गावर प्रवासी संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे कोरोनामुळे बंद झालेली ही रेल्वे सेवा सुरु करण्याची मागणी प्रवाशांनी केली होती.
Pune-Lonavala Local
Pune-Lonavala LocalSakal
Summary

लोणावळा लोकल रेल्वेने या मार्गावर प्रवासी संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे कोरोनामुळे बंद झालेली ही रेल्वे सेवा सुरु करण्याची मागणी प्रवाशांनी केली होती.

पुणे - पुणे-लोणावळा (Pune-Lonavala) या लोहमार्गावर (Railwayline) तीन अतिरिक्त लोकल (Local) रेल्वे गाड्या सुरू करण्याचा निर्णय रेल्वे विभागाने घेतला आहे. बुधवारपासून पुणे आणि शिवाजीनगर या अतिरिक्त तीन रेल्वे गाड्या सहा फेऱ्यांसह प्रत्यक्ष धावणार आहेत, असे मध्य रेल्वेने सांगितले.

लोणावळा लोकल रेल्वेने या मार्गावर प्रवासी संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे कोरोनामुळे बंद झालेली ही रेल्वे सेवा सुरु करण्याची मागणी प्रवाशांनी केली होती. त्यानुसार पहिल्या टप्प्यात लोकलच्या चार रेल्वे गाड्यांसह आठ फेऱ्या सुरू केल्या होत्या. त्यानंतर कोरोनाचा संसर्ग कमी होताच २० फेऱ्यांसह लोकल सेवा सुरू करण्यात आली होती. आता बुधवारपासून एकूण १३ रेल्वे गाड्यांसह २६ फेऱ्यांसह लोकल धावणार आहे. कोरोनापूर्वी एकूण ४२ फेऱ्यांसह ही लोकल सेवा होती. टप्प्याने ही सेवा पूर्वी प्रमाणे पूर्ववत केली जाणार आहे. सध्या प्रवासी केवळ ४० टक्केच आहेत. तशी प्रवासी संख्या वाढेल त्याप्रमाणे लोकलची संख्या वाढवली जाईल. असे रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांनी सांगितले.

जादा लोकलचे वेळापत्रक

पुणे स्टेशन आणि शिवाजीनगर ते लोणावळा

  • पुण्याहून सकाळी ११.१७ वाजता सुटेल आणि १२.३७ वाजता लोणावळ्यात

  • लोणावळ्यातून ३.३० वाजता सुटेल आणि पुण्यात ५.०५ वाजता पोहचेल

  • पुण्याहून ५.१५ वाजता लोणावळ्यात ६.३८ वाजता पोहचेल

  • लोणावळ्यातून ७ सुटेल आणि शिवाजीनगरला ८.२५ वाजता पोहचेल.

  • शिवाजीनगर ते लोणावळा - शिवाजीनगरहून ८.३५ वाजता सुटेल आणि ९.५१ वाजता लोणावळ्यात पोहचेल

  • लोणावळ्यातून १०.५ वाजता सुटून पुण्यात ११.२५वाजता पोहचेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com