भिगवणमधील सायकल मॅरेथॉन तीनशे स्पर्धकांचा सहभाग

भिगवणमधील सायकल मॅरेथॉन तीनशे स्पर्धकांचा सहभाग

भिगवण : येथील सायकल क्लब व रोटरी क्लब यांच्या वतीने भिगवण ते भादलवाडी (ता.इंदापुर) येथील बिल्ट कंपनी दरम्यान सायकल मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. येथील बस स्थानकाजवळ आर्यनमॅन सतीश ननवरे व भिगवण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांनी हिरवा झेंडा दाखवुन स्पर्धेस सुरुवात केली. स्पर्धेमध्ये आठ ते साठ वर्षापर्यतच्या सुमारे तीनशे स्पर्धकांनी सहभाग घेतला.

''वाहनांच्या वापरांमुळे वाढणारे प्रदुषण आटोक्यात यावे, सायकलचा वापर वाढावा व मानवी आरोग्य सुधारावे या हेतुने सायकल क्लब व रोटरी क्लबच्या वतीने सायकल मॅरेथ़ॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मॅरथॉन स्पर्धेनंतर भादलवाडी (ता.इंदापुर) येथील बिल्ट कंपनी येथील मैदानावर लकी ड्रॉ पध्दतीने रोहित बगाडे, नवनाथ गलांडे, अभिनव जगताप, शुभम मंडलिक व ज्ञानेश्वरी विजय थोरात या पाच स्पर्धकांना विजेते घोषित करत आर्यन मॅन सतीश ननवरे यांचे हस्ते सायकल भेट देण्यात आल्या. कार्यक्रमासाठी बिल्ट कंपनीचे प्रमुख नागेंद्र भट, व्यवस्थापक बाळासाहेब सोनवणे, भाजपचे मारुतराव वणवे, प्राचार्य ए. एस. बंदीष्टी, योगीता काळोखे, बारामती सायकल क्लबचे अजित चव्हाण, दौंड सायकल क्लबचे झगडे, भिगवण सायकल क्लबचे अध्यक्ष संपत बंडगर, रोटरीचे अध्यक्ष कमलेश गांधी उपस्थित होते. 

आर्यनमॅन सतीश ननवरे म्हणाले, ''सायकल प्रवास ही केवळ प्रर्दशनाची बाब नाही तर तर तो आरोग्यदायी जीवनाचा मार्ग आहे. संतुलित आहार व सातत्य पुर्ण व्यायाम ही सुदृढ व आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. त्याचा प्रत्येकांना अवलंब केला पाहिजे. सायकलचा वापर वाढल्यास आरोग्याच्या समस्या निश्चित कमी होतील.
भिगवण सायकल क्लबचे अध्यक्ष संपत बंडगर म्हणाले, ''नेचर फाऊंडेशनच्या माध्यमातुन पर्यावरण संरक्षणाच्या कामास सुरुवात केली. दरम्यानच्या काळात सायकलमुळे पर्यावरण संरक्षणांसह अरोग्याचे प्रश्नही सुटण्यास मदत होईल असा विश्वास वाटल्यामुळे मागील एक वर्षापासुन सायकल क्लबच्या माध्यमातून सायकल वापराचा प्रचार व प्रसार करत असुन त्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे. मध्यंतरीच्या काळात लुप्त झालेली सायकल आत्ता रस्त्यावर दिसु लागली आहे.''

यावेळी महेश शेंडगे, रियाज शेख, रणजित भोंगळे यांनी मनोगत व्यक्त केले. साईधाम सायकल मार्ट, बोगावत बिग बझार, चौधरी स्टील फर्निचर, पद्मावती ग्राफिक्स, प्रगती आर्टस्, अर्जुन तोडेकर, औंदुंबर हुलगे, पप्पू भोंग यांचे वतीने सायकल देण्यात आल्या.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सचिन बोगावत यांनी तर आभार संदिप वाकसे यांनी मानले. संजय चौधरी, केशव भापकर, डॉ. जयप्रकाश खरड, नितिन चितळकर, नामदेव कुदळे, प्रदीप वाकसे, डॉ. अमोल खानावरे, डॉ. संकेत मोरे, प्रवीण ढोले, अर्जुन तोडेकर, प्रविण वाघ, पप्पू भोंग, औदुंबर हुलगे, अकबर तांबोळी यांनी परिश्रम घेतले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com