Pune Rains : ट्रेझर पार्क पार्किंगमधून तीनशे दुचाकी काढल्या

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 सप्टेंबर 2019

ट्रेझर पार्क सोसायटीच्या पार्किंगमधील पाणी ओसरल्याने रहिवासी आपापल्या दुचाकी बाहेर काढत आहेत. मात्र चारचाकी चिखलात रुतल्या आहेत. जोपर्यंत पार्किंगमधील संपूर्ण गाळ काढला जात नाही, तोपर्यंत त्या काढणे अशक्‍य आहे. रविवारी सकाळपासून तीनशे दुचाकी बाहेर काढण्यात आल्या.

सहकारनगर - ट्रेझर पार्क सोसायटीच्या पार्किंगमधील पाणी ओसरल्याने रहिवासी आपापल्या दुचाकी बाहेर काढत आहेत. मात्र चारचाकी चिखलात रुतल्या आहेत. जोपर्यंत पार्किंगमधील संपूर्ण गाळ काढला जात नाही, तोपर्यंत त्या काढणे अशक्‍य आहे. रविवारी सकाळपासून तीनशे दुचाकी बाहेर काढण्यात आल्या.

पूरस्थितीनंतर घरात पाणी, लाइट, गॅस नसल्याने काही सभासद नातेवाईक, हॉटेलमध्ये राहत आहेत; तर काही बाहेरगावी गेले आहेत, त्यामुळे त्यांच्या सुमारे चारशे ते पाचशे गाड्या पार्किंगमध्ये आहेत. 

सोसायटीतील रहिवासी योगेश वाबळे म्हणाले, ‘‘चार दिवस झाले दोन दुचाकी, एक चारचाकी पार्किंगमध्येच आहे. दुचाकींची दुरवस्था झाली असून, प्रत्येकी तीन हजार रुपये खर्च येणार असल्याचे मेकॅनिकने सांगितले.’’

माझी दुचाकी नवीन असून गेले चार दिवस पार्किंगमध्ये आहे. गाडीची दुरवस्था झाली असून, मोठे नुकसान झाले आहे.
-नीलेश सज्जन, रहिवासी   


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three hundred wheelers removed from Treasure Park parking

टॅग्स