Pune News : पारगाव येथे ऊसतोड मजुरांच्या तीन झोपड्या जळून खाक

एक लाखाचे नुकसान सुदैवाने जीवितहानी टळली
Three huts of sugarcane workers burnt in Pargaon Loss of one lakh pune
Three huts of sugarcane workers burnt in Pargaon Loss of one lakh punesakal

पारगाव : पारगाव ता.आंबेगाव येथील चिकगाई मळा रस्त्यावर असलेल्या ऊसतोडी मजुरांच्या झोपड्यांना लागलेल्या आगीत तीन झोपड्या जळून खाक झाल्या या आगीत ऊसतोडणी मजुरांच्या संसार उपयोगी वस्तू धान्य, कपडे, जळून खाक झाले. एकूण सुमारे एक लाख रुपयांंचे नुुुकसान झाले. सुदैवाने कोणतीही जीवीत हानी झाली.

येथील भीमाशंकर साखर कारखाना लगत चिचगाईमळा रस्त्यावर आज गुरुवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली आगीचे कारण समजू शकले नाही याबाबत सविस्तर माहिती अशी की भीमाशंकर साखर कारखान्याच्या बाजूला चिचगाई वस्ती जवळ आनशाबा खंडू चितळकर,

अर्जुन नवनाथ क्षीरसागर तसेच किसन आनशाबा चितळकर (मूळ रा. पाथर्डी ) ऊसतोडणी मजुर ऊसाच्या पाचटापासून तयार केलेल्या झोपडया असून सकाळी ऊसतोडणी मजूर ऊसतोडण्यासाठी शेतात गेले होते.

दुपारी एक वाजण्याच्या सुमारास या तीन झोपड्यांना आग लागली ऊसाच्या पाचटामुळे आगीने उग्ररूप धारण केल्यामुळे तीनही झोपड्या जळून खाक झाल्या या आगीत आनशाबा चितळकर यांचे सहा पोती धान्य ,कपडे ,टिव्ही ,संसार उपयोगी वस्तू जनावरांचे खाद्य जळून खाक झाले त्यांचे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले.

तसेच अर्जुन क्षीरसागर यांचे धान्य ,कपडे ,संसार उपयोगी वस्तू जळून जाऊन ३० हजार रुपययांचे नुकसान झाले. व किसन चितळकर यांच्या धान्य ,कपडे ,वस्तू जळून जाऊन ३० हजार रुपयांचे नुकसान झाले.

भीमाशंकर साखर कारखान्याने आग विझवण्यासाठी पाण्याचा टँकर पाठवल्याने आग नियंत्रणात आली त्यामुळे पुढील मोठी दुर्घटना टळली . आग विझवण्यास संतोष वाव्हळ. संतोष वाघमारे.व नामदेव खरात जेसीबी ऑपरेटर निलेश खुडे यांंनी प्रयत्न केले.

भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, उपाध्यक्ष प्रदिप वळसे पाटील व कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे यांच्या सूचनेवरून ऊस तोडी मजुरांना तातडीने सर्वप्रकारची कपडे तसेच आठ दिवस पुरेल एवढा किराणा देण्यात आला याचे वाटप कारखान्याचे संचालक माऊली आस्वारे,

रामहरी पोंदे व मुख्य शेती अधिकारी दिलीप कुरकुटे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी सुरक्षा अधिकारी कैलास गाढवे,ऊस विकास अधिकारी सोमेश्वर दीक्षित , गटप्रमुख किरण गरुड ,संतोष थोरात, विजय सटाले , माजी उपसरपंच विठ्ठल ढोबळे आदी उपस्थित होते.या घटनेचा पंचनामा गावकामगार तलाठी विकास खोटे यांनी केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com