पुणे : गॅसगळती होऊन स्फोट; लहान बाळासह आई-वडील जखमी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 जानेवारी 2020

खराडी परिसरात सोमवारी सकाळी गॅस गळती होऊन मोठा स्फोट झाला आहे. यामध्ये सहा महिन्यांच्या मुलीसह आई-वडील गंभीर जखमी झाले आहेत.

पुणे : खराडी परिसरात सोमवारी सकाळी गॅस गळती होऊन मोठा स्फोट झाला आहे. यामध्ये सहा महिन्यांच्या मुलीसह आई-वडील गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी सकाळी पावणेआठच्या सुमारास संभाजीनगर येथे घडली.

दरम्यान, शंकर भवाळे (वय 28), आशा शंकर भवाळे (वय  22) आणि स्वराली भवाळे (6 महिने) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खराडी येथील संभाजीनगरमध्ये शंकर भवाळे हे आपल्या पत्नी व लहान मुलीसह घरात झोपले होते. रात्री गॅस गळती होऊन तो गॅस स्वयंपाक घरात पसरला होता. सकाळी पावणे आठ वाजण्याच्या सुमारास आशा उठल्या. पाणी तापविण्यासाठी त्यांनी लाईट लावण्यासाठी बटण दाबले. त्याबरोबर मोठा स्फोट होऊन आग लागली.

हा स्फोट इतका मोठा होता की, त्यामुळे चार खोल्यांवरील पत्रे उडाले. स्वयंपाकाच्या ओटावरील गॅस शेगडीवर वरच्या बाजूचे भिंतीच्या वरच्या भागातील सिमेंट पडले. शेगडी पूर्ण वाकडी झाली आहे. गॅस सिलेंडर व्यवस्थित आहे.

स्फोटानंतर लागलेल्या आगीत घरातील सर्व कपडे व इतर साहित्य जळून गेले. अग्निशामक दलाने ही आग तातडीने विझविली. या आगीत घरातील तिघेही जखमी झाले असून सहा महिन्यांची स्वराली गंभीर जखमी झाली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three injured gas blast in pune

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: