बस-ट्रक अपघातात तिघे ठार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 ऑक्टोबर 2019

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर बऊरजवळ सोमवारी (ता. २१) पहाटे बसने ट्रकला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात मतदानासाठी निघालेले साताऱ्याचे तिघे जण मृत्युमुखी पडले; तर वीस प्रवासी जखमी झाले. त्यातील आठ जणांची प्रकृती गंभीर आहे. 

लोणावळा - मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर बऊरजवळ सोमवारी (ता. २१) पहाटे बसने ट्रकला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात मतदानासाठी निघालेले साताऱ्याचे तिघे जण मृत्युमुखी पडले; तर वीस प्रवासी जखमी झाले. त्यातील आठ जणांची प्रकृती गंभीर आहे. 

सयाजी पांडुरंग पाटील (वय ६०), संभाजी शिवाजी पाटील (वय ४५, वझोळी, पाटण, जि. सातारा), मोहनकुमार शेट्टी (वय ४२, रा. वांगणी, बदलापूर) अशी मृतांची नावे आहेत. 

दोन बसचा अपघात
दुसऱ्या एका घटनेत द्रुतगती मार्गावर कामशेत बोगद्याच्या पुढे बऊर चौकीजवळ पहाटे साडेतीनच्या सुमारास मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या दोन बस एकमेकांवर आदळून झालेल्या अपघातात मागील बसमधील चालकासह चार प्रवासी जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती कळताच 

वडगाव महामार्ग, कामशेत पोलिस व रस्ते विकास महामंडळाच्या आपत्कालीन आणि देखभाल दुरुस्ती विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. बसमधील मृतांना व जखमींना तत्काळ बाहेर काढून मदतकार्य सुरू केले. 

डुलकी लागल्याने अपघात?
द्रुतगती मार्गावरील उतार व वळणावर पहाटे चालकास डुलकी लागल्याने बसने उभ्या वाहनांना मागून ठोकरल्याने हे दोन्ही अपघात झाले असण्याची शक्‍यता वाहतूक पोलिसांनी व्यक्त केली. अपघातग्रस्तांवर ओझर्डे येथील ट्रामा सेंटर व सोमाटणे येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three killed in bus accident