प्रवेशाच्या बहाण्याने तीन लाखांची फसवणूक 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 एप्रिल 2018

पुणे - एमबीबीएस महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने ट्रॅव्हल्स ऑफिसमध्ये तिकीट बुकिंग करणाऱ्या व्यक्तीने महिलेकडून तीन लाख रुपये उकळले. मुलीला एमबीबीएसला प्रवेश मिळवून न देता संबंधित व्यक्ती खोटे बोलत असल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिस ठाण्यात धाव घेतली. 

या प्रकरणी सुलोचना कापसे (वय 48, रा. लोअर इंदिरानगर, बिबवेवाडी) यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात दिलीप नावाच्या व्यक्तीविरुद्ध फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कापसे यांच्या मुलीला एमबीबीएसला प्रवेश घ्यायचा होता. त्यांच्या घरासमोर राहणाऱ्या मुलीने ती काम करत असलेल्या ट्रॅव्हल्स ऑफिसमध्ये तिकीट बुकिंग करणारा व्यक्ती दिलीप याच्याशी चर्चा केली. त्या वेळी त्याने एमबीबीएसला प्रवेश मिळवून देऊ, असे सांगितले. त्यानुसार संबंधित मुलीच्या सांगण्यावरून कापसे यांनी दिलीपची भेट घेतली. त्या वेळी त्याने पंधरा लाख रुपयांमध्ये एमबीबीएसला प्रवेश मिळवून देण्याची बतावणी केली. त्यादृष्टीने कापसे यांचा विश्‍वास संपादन करून प्रारंभी एक लाख रुपये, त्यानंतर आरटीजीएसद्वारे दीड लाख आणि पन्नास हजार रुपये असे एकूण तीन लाख रुपये घेतले. त्यानंतर कापसे यांनी दिलीप याच्याकडे प्रवेशासंदर्भात सातत्याने विचारणा केली. मात्र त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर कापसे यांनी त्यास पैसे परत करण्यास सांगितले. त्या वेळी त्याने सव्वा दोन लाख रुपयांचा धनादेश दिला. हा धनादेशही वटला नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाली आहे, असे लक्षात आल्यानंतर कापसे यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यामध्ये फिर्याद दिली. 

Web Title: Three lakh cheating by the logging of admission

टॅग्स