मास्क कारवाईत साडेबारा कोटी वसूल 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 21 October 2020

पुणे शहर आणि जिल्ह्यातील 3 लाख 13 हजार 208 नागरिकांकडून चार महिन्यांत 12 कोटी 65 लाख 12 हजार 980 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. त्यात शहरातील 1 लाख 20 हजार 816 जणांचा समावेश आहे. 

पुणे - कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी घराबाहेर पडताना मास्क वापरणे अनिवार्य असतानाही या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या पुणे शहर आणि जिल्ह्यातील 3 लाख 13 हजार 208 नागरिकांकडून चार महिन्यांत 12 कोटी 65 लाख 12 हजार 980 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. त्यात शहरातील 1 लाख 20 हजार 816 जणांचा समावेश आहे. 

पुणेकर नागरिकांकडून 5 कोटी 86 लाख 87 हजार 500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवडमधील 28 हजार 780 नागरिकांकडून 2 कोटी 62 लाख 7 हजार 680 रुपयांचा तर, जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील 1 लाख 63 हजार 612 ग्रामस्थांकडून 4 कोटी 16 लाख 17 हजार 800 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. 

पुणे व पिंपरी चिंचवड व ग्रामीण पोलिस आणि जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी आपापल्या कार्यक्षेत्रातील व्यक्तींवर स्वतंत्रपणे ही कारवाई केली आहे. ग्रामपंचायतींनी दंडापोटी वसूल केलेली रक्कम संबंधित ग्रामपंचायतीच्या ग्रामनिधीत जमा करण्यात आली आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील दंड केलेल्या एकूण नागरिकांपैकी जिल्ह्यातील 14 नगरपालिका क्षेत्रातील 11 हजार 109 जण आहेत. या नागरिकांकडून 42 लाख 10 हजार 400 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ग्रामीण भागातील दंड केलेल्या एकूण व्यक्तींपैकी ग्रामीण पोलिसांनी 1 लाख 20 हजार 731 नागरिकांकडून 2 कोटी 58 लाख 6 हजार 900 रुपये तर, ग्रामपंचायतींनी 31 हजार 772 ग्रामस्थांकडून 1 कोटी 16 लाख 500 रुपयांचा दंड वसूल केला असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले. 

जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कोरोनाचा वाढता उद्रेक रोखण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने 15 जूनपासून सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क वापरणे बंधनकारक केले आहे. या निर्णयाचे उल्लंघन करणाऱ्यांकडून प्रत्येकी किमान 500 तर, कमाल 1 हजार रुपयांचा दंड आकारण्यात येत आहे. त्यानुसार 15 जून ते 15 ऑक्‍टोबर या चार महिन्यांच्या कालावधीत ही दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. 

महाराष्ट्रातील बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

क्षेत्रनिहाय दंड वसुली (रुपयांत) 

- पुणे शहर - 5 कोटी 86 लाख 87 हजार 500 

- पिंपरी चिंचवड - 2 कोटी 62 लाख 7 हजार 680 

- ग्रामीण जिल्हा (नगरपालिकांसह) - 4 कोटी 16 लाख 17 हजार 800 

- ग्रामीणपैकी फक्त नगरपालिका - 42 लाख 10 हजार 400 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनाप्रतिबंधासाठी सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे अनिवार्य आहे. तरीही नागरिक याचे उल्लंघन करत आहेत. याला आळा बसावा, या उद्देशाने ही दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली. 
- आयुष प्रसाद,  मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three lakh citizens fined in four months in Pune district