जुन्नरला घरफोडीत तीन लाख 75 हजाराचा ऐवज चोरट्याकडून लंपास 

दत्ता म्हसकर
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

घरातील पाच किलो वजनाचे दोन लाख रुपये किमतीचे चांदीचे दागिने यात पैंजण, चैन, जोडवी, मासोळ्या, बीचवे, अंगट्या इत्यादी तसेच 1 लाख 75 हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण 3लाख 75 हजाराचा ऐवज चोरट्याने लंपास केला असल्याची फिर्याद त्यांनी दिली आहे.
 

जुन्नर : येथील बंद घराच्या दरवाजाचा कडी-कोयडा अज्ञात चोरट्याने तोडून बेडरुमच्या कपाटातील पाच किलो चांदीचे दागिने व रोख एक लाख 75 हजाराचा रक्कमेची चोरी केली असल्याचे निष्पन्न झाले आहे.  

सराफी व्यावसायिक यशवंत नारायण मंचारकर रा. बोडकेंनगर, जुन्नर याबाबतची फिर्याद दिली आहे. मंचरकर हे सहकुटुंब 24 ऑगस्ट ला देवदर्शनासाठी गेले होते. रविवारी ता. 26 ला रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास ते परत आले यावेंळी त्यांना हा प्रकार समजला. 

घरातील पाच किलो वजनाचे दोन लाख रुपये किमतीचे चांदीचे दागिने यात पैंजण, चैन, जोडवी, मासोळ्या, बीचवे, अंगट्या इत्यादी तसेच 1 लाख 75 हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण 3लाख 75 हजाराचा ऐवज चोरट्याने लंपास केला असल्याची फिर्याद त्यांनी दिली आहे.
 

junnar

घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी दिपाली खन्ना पोलिस निरिक्षक सुरेश बोडखे व यशवंत नलावडे यांनी भेट दिली. सहायक पोलिस निरिक्षक मिलिंद साबळे पुढील तपास करीत आहेत. ही घटना समजताच नाकाबंदी लावणेत आली असुन तपास पथकाने तपास सुरू केला आहे. घटनास्थळी आज सकाळी श्वानपथक बोलविण्यात आले होते मात्र श्वान माग काढू शकले नाही. ठसे तज्ञांनी ठसे घेतले आहेत.

जुन्नर तालुक्यात शनिवार व रविवारची रात्र ही चोरट्यांची ठरली आहे. जुन्नरमधील दुकाने व टपऱ्यांचे शटर उचकटून झालेल्या किरकोळ चोऱ्या तसेच सराफी व्यावसायिकांची मोठी घरफोडी बरोबर येडगावला टपाल व पतसंस्थेच्या कार्यालयात, डुंबरवाडी व ओझरला शटर उचकटून 50 हजाराची राजुरीत सराफी दुकानाचे शटर उचकटून दागिन्यांची चोरी, जीप प्रवास करताना महिलेच्या दागिन्यांची चोरी बरवादी आदी घटना पहाता चोरांची टोळी तालुक्यात कार्यरत असल्याची चर्चा आहे.
 

junnar

Web Title: three lakh seventy five thousand stolen at junnar