तीन नवे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प

Dranage-Water-Project
Dranage-Water-Project

पिंपरी - महापालिकेच्या वतीने तीन ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची (एसटीपी) उभारणी करण्यास ऑक्‍टोबरमध्ये प्रारंभ होणार आहे. चिखली, पिंपळे निलख आणि बोपखेल येथील या नियोजित प्रकल्पांची एकूण क्षमता प्रतिदिन ३२ दशलक्ष लिटर (एमएलडी) आहे. दीड वर्षात पूर्ण होणाऱ्या या प्रकल्पासाठी २२.१६ कोटी रुपये खर्च करण्यात येतील.

शहराच्या हद्दीतून मुळा, पवना आणि इंद्रायणी या तीन नद्या वाहत आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी एसटीपी प्लॅंट उभारण्याची सुविधा आहे. शहरात निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेने पुरेसे प्रकल्प उभारले आहेत. ७० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त सांडपाण्यावर सध्या प्रक्रिया करण्यात येते. काही ठिकाणी भविष्याचे नियोजन करून जादा क्षमतेचे प्लॅंट बांधले आहेत, तर काही भागातील सांडपाणी थेट नदीच्या प्रवाहात मिसळले जाते.

चऱ्होली येथे दुसरा एसटीपी प्लॅंट उभारण्यात येत असून, तेथे २० एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचे नियोजन आहे.कंत्राटदारांना काम सुरू करण्याचे आदेश मार्चमध्ये दिल्यानंतर त्यांनी तांत्रिक आराखडा पूर्ण केला आहे, अशी माहिती महापालिकेचे कार्यकारी अभियंता संजय भोसले यांनी दिली.

केंद्र सरकारच्या अमृत योजनेअंतर्गत हे एसटीपी प्रकल्प बांधण्यात येत आहेत. स्थायी समितीने फेब्रुवारीमध्ये कामाला मान्यता दिल्यानंतर कंत्राटदार कंपनीने तांत्रिक आराखडा सादर केला. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाकडे तो तपासणीसाठी नुकताच दिला आहे. त्यांची मंजुरी या महिन्यात मिळताच ऑक्‍टोबरमध्ये प्रत्यक्ष काम सुरू करू.
- संजय भोसले, कार्यकारी अभियंता, ड्रेनेज विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com