पलायन करण्यासाठी मदत करणाऱ्या तिघांना अटक

Three people arrested for helping escape
Three people arrested for helping escape

राजगुरुनगर : खेड पोलिसांच्या कोठडीतून 22 ऑक्टोबर रोजी पलायन केलेल्या दोन आरोपींना पळून जाण्यासाठी मदत करणाऱ्या त्यांच्या तीन साथीदारांना पोलिसांनी आज (२४, ऑक्टोबर) अटक केली. सूरज शिवाजी भालेराव (वय १८), आकाश उर्फ बाबू कैलास गोरे (वय २४) व सचिन शांताराम मुरकुटे (वय २३) ( सर्व रा. मंचर, ता. आंबेगाव) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत, अशी माहिती खेड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अरविंद चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

एका दरोड्याच्या गुन्ह्यातील विशाल दत्तात्रय तांदळे व राहुल देवराम गोयेकर या दोन आरोपींनी, कोठडीच्या खिडकीचे गज कापून पलायन केल्याची घटना 22 ऑक्टोबर रोजी पहाटे घडली होती. याकामी त्यांना बाहेरच्या साथीदारांनी मदत केल्याचा पोलिसांचा कयास होता. पळून गेलेल्या आरोपींचा आणि साथीदारांचा पोलिस शोध घेत होते. आरोपी अटक होण्यापूर्वी आज अटक केलेल्या तिघा संशयितांच्या संपर्कात असल्याची माहिती मिळाली.

तसेच हे तिघेजण आरोपींना न्यायालयात भेटण्यास आले होते. संशयावरून त्यांना ताब्यात घेतल्यावर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपींना न्यायालयात नेले असताना हे तिघे त्याठिकाणी आले होते. तेव्हा आरोपीने त्यांना खुणेने हेक्झॉ ब्लेड देण्यास खुणावले होते. त्यानुसार त्यांनी दसऱ्याच्या सुट्टीचा फायदा घेऊन कोठडीच्या मागच्या बाजूने शौचालयाच्या खिडकीतून ब्लेड पोहचविले. रात्री शौचास जाण्याच्या बहाण्याने आरोपींनी आळीपाळीने जाऊन गज कापले व पहाटे पलायन केले. त्यांच्यावर भा. दं. वि. कलम २२४ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला असून, या सर्वांना उद्या न्यायालयात हजर करणार असल्याची माहिती चौधरी यांनी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com