कामगारांच्या मृत्यूप्रकरणी बिल्डर्ससह तिघांवर गुन्हा 

रविंद्र जगधाने
मंगळवार, 26 जून 2018

पिंपरी : डुडुळगाव येथील रिगल रेसिडेन्सी बांधकाम साइटवर गुरुवारी (ता. 21) लिफ्ट पडून झालेल्या अपघातात तीन कामगारांचा मृत्यू झाला. याप्रकरणी बांधकाम व्यावसायिकसह तिघांवर दिघी पोलिस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र गिरी यांनी फिर्याद दिली. 

भावेश पटेल व चेतन मोहनभाई पटेल (वय 35, दोघीही रा. (रा. साईकृपा अपार्टमेंट, प्लॉट नं. 97/32, सेक्‍टर सहा, मोशी प्राधिकरण), इरफान अली खान (वय 34, रा. 283, श्रीनगर, रहाटणी, काळेवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहे. या दुर्घटनेत पांडुरंग चव्हाण (वय 35), भगवान गायकवाड (वय 29) व अमर राठोड (वय 28) या कामगारांचा मृत्यू झाला.

Web Title: Three people guilty of death of workers