पारगावात तीन दुकानांचे शटर उचकटून चोरी 

सुदाम बिडकर
गुरुवार, 17 मे 2018

पारगाव : पारगाव ता. आंबेगाव येथे आज (गुरुवार) पहाटे अज्ञात चोरट्यांनी तीन दुकानांचे शटर उचकटून चोरी केली. मात्र, चोरट्यांच्या हाती फारसा ऐवज लागला नाही. येथून जाणाऱ्या मंचर पारगाव रस्त्यालगत असलेल्या नानाभाऊ ढोबळे यांचे ऋषी कृषी सेवा केंद्र हे खते, औषधे, बी बियाणे विक्रीचे दुकान व शेजारीच असलेले डॉ. शिवाजी थिटे यांचे शिवसाई मेडीकलच्या दुकानाचे शटर उचकटून नानाभाऊ ढोबळे यांच्या दुकानातील गल्ल्यातून पाच हजार रुपये व औषधाच्या दुकानातून दीडशे रुपये व शँपूच्या पुड्या चोरुन नेल्या. 

नानाभाऊ ढोबळे यांचे दुकान फोडण्याची तिसरी वेळ आहे. जवळच असलेल्या योगेश बढेकर यांच्या सर्वज्ञ मेडीकल या औषधाच्या दुकानाचे शटर उचकटून गल्ल्यातील दीड हजार व काही महत्वाची कागदपत्रे, बँकांचे एटीएम व परफ्युमच्या बाटल्या चोरुन नेल्या. ऋषी कृषी सेवा केंद्र या दुकानात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामुळे चोरटे संख्येने चार होते.

Web Title: three shop shutters and stolen in Pargaon