esakal | चमत्कारी मशीन विक्रीच्या बहाण्याने कोट्यवधींची फसवणूक करणारे तिघे अटकेत 
sakal

बोलून बातमी शोधा

Three suspects arrested for cheating of Crores by selling miraculous machines

चमत्कारी धनलाभ करून देणारी राईस पुलिंग मशीन विक्री करण्याच्या बहाण्याने नागरिकांना फसविल्याप्रकरणी बंगळुरु शहरातील कोडीगेहल्ली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना बंगळुरू पोलिस दलातील निरिक्षक श्रीधर पुजार व त्यांचे पथक पिंपरी-चिंचवड शहरात दाखल झाले. बंगळुरू पोलिसांकडून माहिती घेवून पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने आरोपींचा शोध घेतला. 

चमत्कारी मशीन विक्रीच्या बहाण्याने कोट्यवधींची फसवणूक करणारे तिघे अटकेत 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी : राईस पुलिंग मशीनद्वारे चमत्कारी पद्धतीने धनलाभ होत असल्याचे खोटे सांगून ती मशीन विकण्याच्या बहाण्याने एका टोळीने बंगळुरू येथे नागरिकांची कोट्यवधी रूपयांची फसवणूक केली. या टोळीच्या मुख्य सूत्रधाराश त्याच्या दोन साथीदारांना पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट दोन व बंगळुरू गुन्हे शाखेच्या पथकाने रावेत येथे अटक केली. 

ऑनलाइन बुक केलेली नेलपेंट मिळाली नाही म्हणून तिने...

सिद्धेश्‍वर विष्णू सोनकांबळे (वय 44, रा. शिंदेवस्ती, रावेत, मूळ-रा. शिरवळ, जिल. सोलापूर), बालाजी बसंतराव जानाते (वय 27, रा. चिंचवडेनगर, मूळ-केदारगुंठा, जि. नांदेड), अमित अरूण केदारी (वय 32, रा. पवारवस्ती, बोपोडी, मूळ-रा. कवडी, पिंपळगाव, ता.जि. अहमदनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. चमत्कारी धनलाभ करून देणारी राईस पुलिंग मशीन विक्री करण्याच्या बहाण्याने नागरिकांना फसविल्याप्रकरणी बंगळुरु शहरातील कोडीगेहल्ली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना बंगळुरू पोलिस दलातील निरिक्षक श्रीधर पुजार व त्यांचे पथक पिंपरी-चिंचवड शहरात दाखल झाले. बंगळुरू पोलिसांकडून माहिती घेवून पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने आरोपींचा शोध घेतला. 
अंदमान निकोबारला नेतो सांगून 24 जणांची फसवणूक 

या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार त्याच्या साथीदारांसोबत रावेत येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी या परिसरात सापळा रचला. दरम्यान, एका मोटारीतून जाणाऱ्या संशयिताला ताब्यात घेतले. त्यामध्ये सोनकांबळे आणि त्याचे दोन साथीदार जानाते व केदारगुंठा आढळून आले. या तिघांनाही अटक करून पुढील तपासासाठी बंगळुरू पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

loading image