#PmcIssues कचऱ्यासाठी तीन हजारांची आकारणी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

पुणे - शहरात घरोघरी जाऊन कचरा गोळा करण्याचे काम दिलेल्या स्वच्छ संस्थेचे कर्मचारी मिळकतदारांकडून जादा पैसे घेत असल्याचे उघड झाले आहे. व्यावसायिक मिळकतींच्या व्यवस्थापनाकडून १२० रुपयांऐवजी तीन हजार रुपये घेण्यात येत असल्याचे पुराव्यांवरून स्पष्ट झाले आहे. संस्थेचे कर्मचारी महापालिकेची दिशाभूल करीत असल्याने त्यांचे काम थांबवावे, अशी मागणी महापालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी गुरुवारी केली. या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करणार असल्याचे महापालिकेच्या घनकचरा व व्यवस्थापन विभागाचे प्रमुख सुरेश जगताप यांनी सांगितले. 

शहरातील विविध मिळकतींमधील कचरा गोळा करण्याचे काम स्वच्छ संस्थेला दिले. त्यानुसार संस्थेने महिन्याकाठी निवासी मिळकतींकडून ६० आणि व्यावसायिक मिळकतीचे १२० रुपये घेणे अपेक्षित आहे. परंतु, कर्मचारी मिळकतदारांकडून तीन हजार रुपये घेत असल्याचे आढळले आहे. त्यासाठी छापील अर्ज तयार केला असून त्यात पैसे, कचरा गोळा करणाऱ्या व्यक्तीचे नाव आणि संपर्क आदी बाबींचा उल्लेख आहे. अशा प्रकारचा अर्ज आणि जादा पैसे घेण्याचा अधिकार संस्थेला नाही, तरीही ते घेतले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत तुपे म्हणाले, ‘‘नागरिकांच्या तक्रारी असूनही काम देण्यात आले आहे. मात्र, त्याचे स्वरूप कसे आहे, याची पाहणी होत नाही. कर्मचारी मिळकतदारांकडून अधिक पैसे घेत आहेत, त्यामुळे संस्थेचा करार रद्द करावा.’’

संस्था, विशेषतः शाळा आणि महाविद्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा जमा होतो. अशा संस्थांकडून किती पैसे घ्यायचे, याचा उल्लेख करारात नाही. मात्र, तेथील कचऱ्याचे स्वरूप, प्रमाण लक्षात घेऊन पैसे घेण्यात येत आहेत. त्याची पावती देताे.
- लक्ष्मी नारायण, स्वच्छ संस्था

Web Title: Three thousand Tax for garbage

टॅग्स