मुंबईतील पावसामुळे तीन रेल्वे गाड्या रद्द 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 जुलै 2018

पुणे : मुंबईतील मुसळधार पावसाचा मध्ये रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला असून, उद्या (रविवारी) डेक्कन एक्‍स्प्रेसच्या दोन फेऱ्या व कर्जत-पुणे-कर्जत पॅसेंजर (क्र. 51317 व 51318) गाडी रद्द करण्यात आली आहे. भुसावळ-पुणे या गाडीच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. 

पुणे-मुंबई डेक्कन एक्‍स्प्रेस (गाडी क्रमांक 11008) आणि मुंबई-पुणे डेक्कन एक्‍स्प्रेस (गाडी क्रमांक 1107); तसेच पुणे-कर्जत-पुणे या गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत. भुसावळ-पुणे आणि पुणे-भुसावळ एक्‍स्प्रेस मनमाड, कल्याण, कर्जतऐवजी दौंड, मनमाडमार्गे धावेल, असे मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने कळविले आहे. 
यवत, केडगाव, पाटसला हॉल्ट 

पालखी सोहळ्यानिमित्त यवत, केडगाव आणि पाटस या रेल्वे स्थानकांवर काही गाड्या एक मिनीट थांबणार असल्याचे मध्य रेल्वेने कळविले आहे. 9 ते 12 जुलैदरम्यान हा बदल असेल. हजरत निजामुद्दीन गोवा एक्‍स्प्रेस, मुंबई-हैदराबाद यवतला; तर पुणे- सोलापूर इंटरसिटी एक्‍स्प्रेस केडगावला आणि पुणे-सोलापूर हुतात्मा एक्‍स्प्रेस पाटसला थांबेल, असे मध्य रेल्वेने कळविले आहे. 

एसएमएसद्वारे माहिती कळवावी 
दरम्यान, तिकिटाचे आरक्षण केलेल्या प्रवाशांचे मोबाईल क्रमांक रेल्वेकडे असतात. त्यामुळे त्यांना गाड्या रद्द झाल्याची माहिती एसएमएसद्वारे कळवावी, अशी मागणी रेल्वे प्रवासी ग्रूपच्या अध्यक्षा हर्षा शहा यांनी मध्य रेल्वेकडे केली आहे. 

Web Title: Three trains canceled due to Mumbai's rains