पुण्यात गर्भलिंग निदान चाचणी करणाऱ्या महिला डॉक्टरला सक्तमजुरी

A three year imprisonment for a female doctor who has tested the fetal diagnosis in pune
A three year imprisonment for a female doctor who has tested the fetal diagnosis in pune

पुणे : बेकायदेशीरपणे गर्भलिंग निदान चाचणी करणाऱ्या एका महिला डॉक्टरला न्यायालयाने तीन वर्ष सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा मंगळवारी सुनावली. 

प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी विशाखा पाटील यांनी हा निकाल दिला. डॉ. नीना मथराणी असे या महिला डॉक्टरचे नाव असून त्यांचे विजय टॉकीजजवळ ललित डायग्नोस्टिक सेंटर नावाचे हॉस्पिटल आहे. या प्रकरणात रानडे हॉस्पिटलचे डॉ. मकरंद रानडे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र सुनावणीदरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, डॉ. रानडे आणि डॉ. मथराणी हे मिळून गर्भलिंग निदान चाचणी करीत असल्याची माहिती अखिल भारतीय जनवादी महिला संगटनेच्या किरण मोघे यांना मिळाली होती. त्याबाबत त्यांनी राज्य कुटुंब कल्याण मंडळाला कळवले होते. याचा छडा लावण्यासाठी एका जोडप्याला रुग्णालयात पाठविण्यात आले. डॉ. रानडे यांनी नऊ हजार रुपये घेऊन त्यांना डॉ. मथरानी यांच्या सोनोग्राफी केंद्रात पाठवले. या ठिकाणी कोणताही अर्ज भरून न घेता तपासणी करण्यात आली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर डॉ. रानडेचे रुग्णालय व डॉ. मथरानींचे सोनोग्राफी केंद्र सील करण्यात आले होते. तसेच त्यांचा परवाना जप्त करण्यात आला होता. 

या खटल्याचे कामकाज महापालिकेचे वकील आनंद रणदिवे यांनी पाहिले. त्यांनी एकूण चार साक्षीदार तपासले. त्यांना विधी अधिकारी मंजुषा विधाटे त्यांनी मार्गदर्शन केले. डॉ. मथराणी यांनी कोणत्याही कागदपत्रांची पूर्तता न करता सोनोग्राफी केली. संबंधित महिलेकडून एफ फॉर्म भरून घेतला नव्हता, अशी माहिती वकील रणदिवे यांनी न्यायालयात दिली.

गर्भलिंग निदान चाचणीचे प्रकार थांबवण्यासाठी कडक अनुशासन झाले पाहिजे. मुळात महिलांची संख्या कमी आहे त्यामुळे चाचणी करण्याबाबत दृष्टिकोन बदलायला हवा कोणाला एका व्यक्तीला शिक्षा लागावी, असा उद्देश नाही पण त्यातून समाज परिवर्तन व्हायला हवे.
- आनंत रणदिवे, वकिल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com