फोटोशूट जीवावर बेतले; दौंड - साठवण तलावात बुडून तिघांचा मृत्यू

साठवण तलाव व परिसरात फोटोशूट करण्यासाठी हे युवक गेले होते
Three youths drowned nagarpalika lake daund pune
Three youths drowned nagarpalika lake daund punesakal

दौंड : दौंड नगरपालिकेच्या साठवण तलावात बुडून तीन युवकांचा मृत्यू झाला आहे. साठवण तलाव व परिसरात फोटोशूट करण्यासाठी हे युवक गेले होते.असरार अब्दूल अलीम काझी (वय २१), करीम अब्दूल हादी काझी (वय २०) व अतिक उझजमा फरीद शेख (वय २०, तिघे रा. नवगिरे वस्ती, नगर मोरी, दौंड) अशी त्यांची नावे आहेत. ६ मार्च रोजी दुपारी चार वाजता तिघे एका दुचाकीवर दौंड - कुरकुंभ राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या नगरपालिका साठवण तलाव परिसरात फोटोशूट करून पोहण्यासाठी गेले होते.

रात्री उशिरापर्यंत ते घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला असता ते पोहण्यासाठी गेल्याची माहिती मिळाली. नातेवाईक व मित्रमंडळींनी साठवण तलाव परिसरात पाहणी केली असता त्यांची दुचाकी व कपडे आढळून आल्याने पाण्यात शोध घेतला असता त्यांचे मृतदेह गाळात अडकले होते.तिघांचे मृतदेहांचे दौंड उप जिल्हा रूग्णालयात विच्छेदन करण्यात आले आहे.मृत असरार व करीम काझी हे सख्खे चुलतभाऊ असून अतिक शेख हा त्यांचा शेजारी राहणारा मित्र होता. असरार हा कला शाखेचा पदवीधर असून करीम आणि अतिक हे संगणक विज्ञान शाखेचे विद्यार्थी आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com