पुुणेकरांनो ! उद्याही पावसाची शक्यता

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 एप्रिल 2019

पुणे : उन्हाच्या चटक्‍यांनी हैराण झालेल्या पुणेकरांना गेले तीन दिवस सलग पडणाऱ्या पूर्वमौसमी पावसाच्या सरींनी दिलासा दिला आहे. येत्या मंगळवारीही (ता. 16) दुपारनंतर तुरळक ठिकाणी पावसाची शक्‍यता हवामान खात्याने वर्तविली आहे. कल्याणी नगर, सिंहगड रस्त्यावरील माणिक बाग, कोथरूडच्या काही भागात सोमवारी दुपारी गारा पडल्या. तसेच, सासवड, आंबेगाव तालुक्‍यातही गारांचा पाऊस पडला. 

शहर आणि परिसरात शनिवारपासून संध्याकाळी पावसाची सरी पडत आहेत. त्यामुळे चाळिशीपर्यंत उसळलेला कमाल तापमानाचा पारा अंशतः कमी झाल्याचे निरीक्षण हवामान खात्यातर्फे नोंदविण्यात आले आहे. शहरात सोमवारी संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत कमाल तापमान 39 अंश सेल्सिअस नोंदले गेले. सरासरीपेक्षा 1.4 अंश सेल्सिअसने यात वाढ झाली होती. तर, सोमवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत किमान तापमानाचा पारा सरासरीच्या तुलनेत 2.6 अंश सेल्सिअस वाढून 22.5 अंश सेल्सिअस नोदला. 

br /> सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी शहर आणि परिसरात आकाश अंशतः ढगाळ होते. त्यामुळे कमाल तापमानाचा पारा सरासरीपेक्षा वाढलेला होता. चाळिशीपर्यंत उसळलेला कमाल तापमानाचा पारा पूर्वमौसमी पावसाच्या हजेरीमुळे अंशतः कमी झाल्याची माहिती हवामान तज्ज्ञांनी दिली. 
पण, सोमवारी दुपारी उन्हाचा चटका कायम होता. त्यामुळे त्यातील अतिनील किरणांचा निर्देशांकही सोमवारी दुपारी 5.4 नोंदला गेला. चारच्या पुढे अतिनील किरणांचा धोका वाढत राहातो, असे भारतीय उष्णकटिबंधीय हवामान संस्थेच्या (आयआयटीएम) "सफर'तर्फे सांगण्यात आले. 

उन्हाचा चटका कमी होणार 
शहर आणि परिसरात पुढील चोवीस तासांमध्ये उन्हाचा चटका आणखी कमी होईल. कमाल तापमान 39 वरून 38 अंश सेल्सिअसपर्यंत कमी होईल. तर, किमान तापमानाचा पारा 22 वरून 20 अंश सेल्सिअस होईल, असा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आला आहे. पुढील दोन दिवस आकाश अंशतः ढगाळ राहणार असून, संध्याकाळी तुरळक भागात पावसाच्या सरी पडतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 
 
Web Title: Thunderstorm accompanied with lightning at Pune in news 24 hrs