'थिसेनक्रूप'च्या अंगणात पक्ष्यांचा चिवचिवाट

सागर शिंगटे
रविवार, 9 फेब्रुवारी 2020

शहर परिसराच्या मध्यभागात थिसेनक्रूप इंडस्ट्रीज वसली आहे. या उद्योगाच्या आवारात सुमारे नऊशे लहान-मोठी झाडे आहेत. फुलझाडे, फळझाडांबरोबरच आयुर्वेदिक, शोभेच्या झाडांचाही त्यात अंतर्भाव आहे, त्यामुळे या भागांत पक्ष्यांचा वावर पूर्वीपासूनच आहे. या झाडांवर कंपनीमधील कर्मचारी पक्षिमित्र अविनाश नागरे यांच्या पुढाकाराने पक्ष्यांसाठी कृत्रिम घरटी बसविण्यात आली आहेत, त्यामुळे कंपनीचे आवार पक्ष्यांच्या निवाऱ्याचे हक्काचे स्थान बनले आहे

पिंपरी : शहरातील उद्योगधंदे, व्यवसाय आणि कारखानदारीबरोबरच सिमेंटच्या वाढत्या जंगलामुळे परिसरातील पशू-पक्ष्यांचा नैसर्गिक निवारा हिरावत चालला आहे. असे असताना पिंपरीतील थिसेनक्रूप इंडस्ट्रीज निरनिराळ्या पक्ष्यांसाठी आश्रयस्थान झाली आहे. कंपनीच्या आवारातील कृत्रिम घरट्यांमुळे सुमारे 18 प्रजातींचे पक्षी वास्तव्याला येत आहेत. येत्या महिन्याभरात तेथे 17 नवीन कृत्रिम घरटी बसविली जाणार आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शहर परिसराच्या मध्यभागात थिसेनक्रूप इंडस्ट्रीज वसली आहे. या उद्योगाच्या आवारात सुमारे नऊशे लहान-मोठी झाडे आहेत. फुलझाडे, फळझाडांबरोबरच आयुर्वेदिक, शोभेच्या झाडांचाही त्यात अंतर्भाव आहे, त्यामुळे या भागांत पक्ष्यांचा वावर पूर्वीपासूनच आहे. या झाडांवर कंपनीमधील कर्मचारी पक्षिमित्र अविनाश नागरे यांच्या पुढाकाराने पक्ष्यांसाठी कृत्रिम घरटी बसविण्यात आली आहेत, त्यामुळे कंपनीचे आवार पक्ष्यांच्या निवाऱ्याचे हक्काचे स्थान बनले आहे.

बारामतीत पहिला रणजी सामना रंगणार 'या' तारखेला

नागरे म्हणाले, "साधारणतः बारा वर्षांपूर्वी आम्ही कंपनीच्या आवारातील निरनिराळ्या झाडांवर 52 कृत्रिम घरटी बसविण्याचा प्रयोग केला, तो यशस्वी ठरला. सुरुवातीला बांबू, लाकडाबरोबरच पीव्हीसी पाइपचाही घरट्यांसाठी वापर केला. मात्र, हवेतील उष्म्यामुळे पीव्हीसी पाइपमध्ये घरटी वसविण्यास पक्ष्यांचा प्रतिसाद लाभला नाही. मात्र, लाकडी घरट्यांचा पक्ष्यांनी वापर केल्याचे दिसून आले. राखी धनेश (ग्रे हॉर्नबिल), पिंगळा (स्पॉटेड आउलेट) पोपट, साळुंकी, जंगली मैना, टीट, खारी, पहाडी पोपट आदी पक्ष्यांनी कृत्रिम घरट्यांमध्ये जवळपास प्रत्येक हंगामात वास्तव्य केले आहे. 52 पैकी 22 घरटी ऊन, वारा आणि पावसामुळे खराब झाल्याने लवकरच त्या जागेवर नवीन सुमारे सतरा घरटी बसविली जाणार आहेत.

'बाहुबली'ची देवसेना क्रिकेटरच्या प्रेमात; लवकरच लग्न?

पिंगळ्याच्या तीन पिलांची भरारी राखी धनेश पक्ष्याचा मार्च ते जून असा विणीचा हंगाम असतो. पिंगळ्याच्या जोडीने काही दिवसांपूर्वी पाच अंडी घातली होती, त्यांपैकी तीन अंड्यांतून पिले बाहेर आली. या दोन्ही पक्ष्यांच्या घरट्यांमध्ये कॅमेरेही बसविण्यात आले होते, त्यामुळे त्यांचे संपूर्ण जीवनचक्रही नागरे यांना टिपता आले आहे. काही घरट्यांत मधमाश्‍या आणि खारूताईनेही वास्तव्य केल्याचे त्यांना दिसून आले. "आम्ही पर्यावरण संवर्धनाकडे पूर्वीपासूनच लक्ष दिले आहे. कंपनीच्या आवारातील नऊशेपैकी जवळपास पाचशे झाडे मोठी आहेत. पक्ष्यांना कृत्रिम घरटी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आमची सकारात्मक भूमिका राहिली आहे. नागरे यांना आवश्‍यक मदतही केली जात आहे.'' - रणजित मोहिते, व्यवस्थापक, मनुष्यबळ विकास


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thyssenkrupp Industries became shelter of birds