पुण्यात होणार 'Tik Tok फिल्म फेस्टिव्हल'

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 ऑगस्ट 2019

पुणे : टिक टॉक अॅपची क्रेझ सध्या वाढत आहे. तरुणाईसह मोठ्यांनाही या अॅपचे वेड लागले लागले आहे. म्हणूनच की चक्क टिकटॉक व्हिडिओ फिल्म फेस्टिव्हल होणार आहे.इतकेच नाही बेस्ट व्हिडिओ रोख बक्षिसही देणार आहे. अर्थातच हा  प्रकार फक्त पुण्यातच घडू शकतो. आता या टिकटॉकचे वेड पुणेकरांनाही लागले आहे.

टिक टॉक अॅप अल्पावधीत लोकप्रिय झाले. आजकाल प्रत्येकजण या अॅपवर रेकार्डेट डायलॉग ऐकून त्यावर लिप्सिंग करुन व्हिडिओ तयार करुन पोस्ट करतात. टिकटॉकमुळे लोकांना जास्तीत जास्त फॉलअर्स निर्माण करता येतात. म्हणूनच की आयोजकांनी टिक टॉक फिल्म फेस्टिव्हलची घोषणा केली आहे.
tik tok film festival

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tick Tok Film Festival to be held in Pune