वाघाचा कौटुंबिक संघर्ष

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 डिसेंबर 2018

पुणे - भावंडांतील भांडण हे काही फक्त माणसांमध्येच असते, असे नाही तर, ते वन्यप्राण्यांमध्येही प्रकर्षाने दिसते. व्याघ्र कुटुंबातील असाच कौटुंबिक संघर्ष तुम्हाला बघायला आवडेल ना? दोन-तीन वाघ आपापसात भांडत आहेत... एकमेकांवर डरकाळ्या फोडत आहेत... पंजाने हल्ला करत आहेत... टोकदार सुळ्यांनी आक्रमण करत दुसऱ्या वाघाला शरणागती पत्करायला भाग पाडत आहेत... हे सगळं तुम्हाला नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी संध्याकाळी सव्वासहा वाजता प्रभात रस्त्यावरील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या प्रेक्षागृहात पडद्यावर पाहता येणार आहे.

वन्यजीव चित्रपटकार नल्ला मुत्थू यांनी चित्रित केलेल्या ‘क्‍लॅश ऑफ टायगर्स’ची ही कहाणी आहे. नेचर वॉक चॅरिटेबल ट्रस्ट, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय आणि राज्याचा वन विभाग यांच्यातर्फे या चित्रपटाचा पहिला ‘शो’ पुण्यात आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती ‘नेचर वॉक’चे अनुज खरे यांनी दिली. 

‘क्‍लॅश ऑफ टायगर्स’ हा चित्रपट एका व्याघ्र कुटुंबावर चित्रित केला आहे. राजस्थानातील रणथंभोर व्याघ्र प्रकल्पातील वाघांच्या जीवनावर प्रकाश टाकणारा हा चित्रपट आहे. कृष्णा नावाची वाघीण ही यातील प्रमुख पात्र आहे. तिला चार बछडे असतात. त्यांचे पालनपोषण ती करत असते. या बछड्यांना जंगलात सुरक्षित ठिकाणी हलविताना एका बछड्याचा मृत्यू होतो. उरलेल्या तीन बछड्यांत दोन बहिणी आणि एक भाऊ असतो. या तिघांना कृष्णा मोठी करत असतानाच त्यांच्या कुटुंबावर एक संकट उभं राहतं. हे संकट आणि कुटुंबातील सत्तासंघर्ष यात कृष्णाची लागलेली कसोटी याचं चित्रण मुत्थू यांनी यात केलं आहे. या चित्रपटाचे पहिले ‘स्क्रिनिंग’ मुत्थू यांच्या उपस्थितीत १ जानेवारीला होणार आहे. यासाठी प्रवेश मोफत आहे.

Web Title: Tiger Disturbance