शानदार नामकरण सोहळा

शानदार नामकरण सोहळा

कात्रज - मार्जार कुलामध्ये एका वेळी जन्मलेल्यांपैकी एक किंवा दोनच बछडे जगतात, असा निसर्गनियम मानला जातो; मात्र कात्रज प्राणिसंग्रहालयाने चारही बछड्यांना सुखरूप ठेवून आज त्यांचा शानदार नामकरण सोहळा अनुभवला. बगीराम व रिद्धी यांच्यापासून कोजागरी पौर्णिमेला जन्मलेल्या बछडीचे पौर्णिमा, तर तीन नर बछड्यांचे आकाश, गुरू आणि सार्थक असे नामकरण करण्यात आले. पान, साखर आणि पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला. या वेळी महापौर मुक्ता टिळक यांची प्रमुख उपस्थिती होती.

जंगलात जन्मलेल्या वाघांच्या बछड्यांपैकी दोन अथवा क्वचितप्रसंगी तीन सदृढ बछडे जगतात, हा निसर्गनियम मानला जातो; परंतु प्राणिसंग्रहालय प्रशासनाने केलेल्या अथक प्रयत्नांमुळे चारही बछडे सुखरूप स्वच्छंदीपणे बागडत आहेत.

प्राणिसंग्रहालयाच्या प्राणी संकलन योजनेत समाविष्ट असणारी महत्त्वाची प्रजाती म्हणून ‘रॉयल बेंगॉल टायगर’ म्हणजेच पिवळा पट्टेरी वाघ हा पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे. प्राणिसंग्रहालयात दोन नर व तीन मादी वाघ आहेत. गर्भधारणेनंतर एकशे पाच दिवसांचा कालावधी पूर्ण केल्यामुळे रिद्धीने आठ तासांत पाच बछड्यांना जन्म दिला. त्यातील एका अशक्त बछड्याचा मृत्यू झाला होता. तीन नर आणि एक मादी बछड्यास पाहून तब्बल सहा महिने डोळ्यांत तेल घालून देखभाल करणारे मुख्य पशुपालक श्‍यामराव खुडे, सिद्धार्थ कांबळे, विशाल आदमाने, गणेश टोले, मनोज जाधव, दीपक धुमाळ, कौशिक काशीकर, दत्ता चांदणे आणि अधिकाऱ्यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. बछडे साडेतीन महिन्यांनी सक्षम झाल्यानंतर नामकरणाचा मुहूर्त काढण्यात आला. मुख्य उद्यान अधीक्षक अशोक घोरपडे, उद्यान विभागाचे कार्यकारी अभियंता सुधीर कदम, प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. राजकुमार जाधव, डॉ. नवनाथ निघोट नगरसेवक वसंत मोरे, युवराज बेलदरे यांच्या उपस्थितीत बछड्यांचा नामकरण सोहळा पार पडला. 

पांढऱ्या वाघाची जोडी येणार
अठरा वर्षांपूर्वी पेशवे पार्क येथे बछड्यांचा जन्म झाला होता. त्यानंतर प्रदीर्घ कालावधीनंतर हा योग आला. नर बगीराम हा जंगली असून, त्याला पेंच व्याघ्र प्रकल्पातून आणले आहे. जंगली वाघांपासून जन्मलेल्या बछड्यांना इतर प्राणिसंग्रहालयांकडून मोठी मागणी असते. वर्षानंतर यातील दोन बछड्यांच्या बदल्यात पांढऱ्या वाघांची जोडी आणण्याचे नियोजन असल्याचे प्रशानाने सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com