उद्योगनगरीतही ‘टिकटॉक’ची क्रेझ

Tik-Tok
Tik-Tok

पिंपरी - सोशल मीडियाच्या महाकाय प्लॅटफॉर्मवर तरुणाई रात्रंदिवस खिळून असते. त्यातील विविध ॲप्स ही खास तरुणाईला डोळ्यांसमोर ठेवूनच बनवलेली असतात. सध्या ‘टिकटॉक’ या ॲपची अशीच सर्वत्र चलती आहे.

नवोदित कलाकारांसाठी हे ॲप पर्वणीच ठरत आहे. त्यावर शहरातील 
अनेक कलाकार सक्रिय असून, टिकटॉक सेलिब्रिटी होण्याचा मान मिळवित आहेत. 

चिंचवड, भोसरी, वाकड, आकुर्डी, पिंपरीतील सुमारे हजारो कलाकार टिकटॉकवर आहेत. ‘पीसीएमसी’ हा हॅशटॅग वापरून कलाकारांनी टिकटॉकवर सर्वांत मोठे स्थान मिळविले आहे. यामध्ये पीसीएमसी रॉक्‍स, लव्ह पीसीएमसी, रॉयल पीसीएमसी, किंग पीसीएमसी, एमएच १४ पीसीएमसी, बॉईज पीसीएमसी, पीसीएमसी पॅटर्न, टिकटॉक पीसीएमसी, सरदार पीसीएमसी, क्वीन पीसीएमसी, डॉग फायटर पीसीएमसी, सुपर ग्रे पीसीएमसी अशा विविध हॅशटॅगची टिकटॉकवर चलती आहे. 

अर्थार्जनाचे सर्वांत मोठे माध्यम म्हणून टिकटॉककडे तरुणाई पाहत आहे. मात्र, भावनांच्या आहारी जाऊन काही कलाकार लाईक्‍सचा हट्ट धरत आहेत. 

त्यासाठी तरुणीही किळसवाण्या प्रकारे विनवण्या करीत आहेत, तर काही यूझर्स तरुणींना चांगल्या वाईट कॉमेंट करून व्हिडिओ काढण्याचा सल्लाही देताना दिसत आहेत.

नवोदित कलाकारांना नवे व्यासपीठ
अभिनयातून झाले टिकटॉक फेम
टिकटॉकद्वारे मिळाल्या विविध भेटवस्तू
महागड्या स्मार्टफोनची वाढली गरज 
स्वतंत्र कॅमेरामनची वाढतेय मागणी

टिकटॉकने गेल्या दोन वर्षांपासून पैसे देणे बंद केले आहे. त्यांच्या काही अटी शर्तीमध्ये बदल झाला आहे. रोज एक व्हिडिओ अपलोड करावा लागतो. परंतु ते कधी-कधी शक्‍य नसते. यासाठी मोठा ग्रुप आवश्‍यक आहे. अवास्तव पैसे खर्च करणेही परवडत नाही. कुटुंबीयांचाही पाठिंबा आवश्‍यक आहे. मात्र, नोकरदारांना रोजचे काम पाहून व्हिडिओ अपलोड करणे अवघड आहे.   
- माही मेहरा, टिकटॉक यूझर, चिंचवड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com