शुभमंगलपूर्वीच पोलिस 'सावधान'

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 मे 2018

येरवडा : मित्राबरोबर विवाह नाही केला तर पळून जाऊ अशी धमकी मुलीने पालकांना दिली. विवाह आंतरजातीय असल्यामुळे पालकांनी मुलीला समजवण्याचा प्रयत्न केला; मात्र मुलीच्या हट्टापुढे पालकांचा नाइलाज होता. त्यांनी विवाहाची जोरात तयारी केली. विवाहाच्या अवघ्या काही तासांपूर्वी अज्ञात व्यक्तीने मुलगी अल्पवयीन असल्याचे पोलिस नियंत्रण कक्षाला दूरध्वनीवरून सांगितले. त्यानंतर वेगाने चक्रे फिरली. अखरे येरवडा पोलिसांनी विवाह रोखला. 

समता व विवेक (नाव बदललेली आहेत) यांच्यात ओळखीतून प्रेम झाले. समताने विवेकबरोबर विवाह करण्यासाठी पालकांकडे हट्ट धरला; मात्र विवेक दुसऱ्या जातीतील असल्यामुळे सुरवातीला समताच्या पालकांनी आडेवेढे घेतले. त्यानंतर समताने पालकांना पळून जाऊन विवाह करण्याची धमकी दिली. त्यामुळे अखरे पालकांनी तिचा विवेकसोबत विवाह करण्यास संमती दिली. एवढेच नाही तर विवाहाचा शुक्रवारी (ता. 25) मुहूर्त काढून पाहुणेमंडळींना लग्नपत्रिकासुद्धा वाटल्या. 

विवाहाचा दिवस उजाडला; मात्र विवाहाच्या काही तासांआधी एका अज्ञात व्यक्तीने पोलिस नियंत्रण कक्षाला येरवड्यात अल्पवयीन मुलीचा विवाह असल्याची माहिती दिली. पोलिस नियंत्रण कक्षाने येरवडा पोलिस ठाण्याला ही माहिती कळविली. त्यानंतर वेगाने चक्रे फिरली. वधू व वरांचे पालक थेट पोलिस ठाण्यात हजर झाले. त्यांनी साखरपुडा आहे, असे सांगण्याचा प्रयत्न केला; मात्र अधिक चौकशी केल्यानंतर विवाह असल्याचे समजले. पालकांकडून लेखी लिहून घेऊन बालविवाह रोखल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक संतोष दराडे यांनी दिली.

Web Title: timely Intervention by yerwada police helps avoid child marriage

टॅग्स