सर्व्हेत निदान झाल्याने वेळेत उपचार

सर्व्हेत निदान झाल्याने वेळेत उपचार

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम; जिल्ह्यात ८५ लाख नागरिकांची तपासणी
पुणे - माझा मित्र कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समजले. मात्र, मला काही त्रास किंवा लक्षणे नव्हती. परंतु, ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेअंतर्गत गावात सर्वेक्षण सुरू होते. या पथकातील कर्मचाऱ्यांनी माझे टेंपरेचर आणि ऑक्‍सिजन लेव्हल तपासली. त्यांना संशय आल्यामुळे कॅम्पमध्ये माझी आणि पत्नीची आरोग्य तपासणी केली. तेथे वाघोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ. वर्षा गायकवाड यांनी आम्ही दोघेही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे सांगितले. त्यानंतर आम्हाला वाघोलीच्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल केले. तेथेही चांगली ट्रीटमेंट मिळाली. सर्व्हेमध्ये निदान झाले म्हणूनच वेळेवर उपचार मिळाले. उशिरा समजलं असतं तर कदाचित अवघड झालं असतं... थेऊरजवळ असलेल्या कोलवडीतील इलेक्‍ट्रिक कॉन्ट्रॅक्‍टर लक्ष्मण गायकवाड ‘सकाळ’शी त्यांचा अनुभव सांगत होते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या कोरोना सर्वेक्षण मोहिमेत शहर आणि जिल्ह्यात एक कोटी १७ लाख नागरिकांच्या आरोग्य तपासणीचे उद्दिष्ट्य आहे. त्यापैकी आजअखेर ८५ लाख नागरिकांचे सर्वेक्षण पूर्ण केले आहे. त्यापैकी चार हजार २५० व्यक्‍ती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या. त्यांच्यावर वेळीच उपचार झाल्यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यात प्रशासनाला यश मिळत आहे. महापालिकेच्या व्यतिरिक्‍त जिल्ह्यातील १४ नगरपालिकांच्या हद्दीत सर्वेक्षण करण्यात आले. त्यात इंदापूर, जुन्नर, लोणावळा, शिरूर, बारामती, जेजुरी, चाकण, भोर, राजगुरुनगर, आळंदी, सासवड, दौंड, वडगाव मावळ आणि तळेगाव दाभाडे या नगरपालिकांचा समावेश आहे. तसेच, एक हजार ४०८ ग्रामपंचायतींपैकी एक हजार २८ गावांमध्ये सर्वेक्षण पूर्ण केले आहे.

जिल्ह्यात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम सर्वांना सोबत घेऊन प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. त्यामुळे संशयित रुग्ण शोधणे आणि अतिजोखमीच्या व्यक्‍तींना वेळेवर उपचार करणे शक्‍य होत आहे. नागरिकांना आरोग्य शिक्षणही देण्यात येत आहे. बाधित रुग्णांना वेळेत उपचार मिळाल्यामुळे कोरोनाचा प्रसार रोखण्यासोबतच मृत्यूदर कमी करण्यात प्रशासनाला यश मिळत आहे.
- डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com