गुळवेलाचे जनुकीय क्रमनिर्धारण पूर्ण

आयसर भोपाळच्या शास्त्रज्ञांचे यश; संशोधनासाठी होणार फायदा
पुणे : गुळवेलाचे जनुकीय क्रमनिर्धारण पूर्ण
पुणे : गुळवेलाचे जनुकीय क्रमनिर्धारण पूर्णsakal

पुणे : कोरोनामध्ये सर्वाधिक वापरात आलेली आयुर्वेदिक वनस्पती म्हणजे गुळवेल! आधुनिक विज्ञानाच्या कसोटीवर खरे उतरण्यासाठी गुळवेलाचे जनुकीय क्रमनिर्धारण आवश्यक होते. ती गरज आता भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (आयसर) भोपाळच्या शास्त्रज्ञांनी पूर्ण केली आहे. १९ हजार ४७४ जनुकांचे क्रमनिर्धारण शास्त्रज्ञांनी पूर्ण केले आहे.

गुळवेल (टिनोस्पोरा कॉर्डिफोलिया) चे जगातील हे पहिले जनुकीय क्रमनिर्धारण असल्याचे आयसर भोपाळचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. विनीत शर्मा यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. त्यांच्या नेतृत्वात श्रुती महाजन, अभिषेक चक्रबर्ती आणि टायटास सील यांनी हे संशोधन केले आहे. बायोअर्काईव्ह या शोधपत्रिकेत या संबंधीचा शोधनिबंध प्रकाशित झाला आहे. गुळवेलाचे आयुर्वेदिक फायदे शास्त्रीय आधारावर सिद्ध करण्यासाठी या संशोधनाचा मोठा फायदा होणार आहे.

जनुकीय क्रमनिर्धारेची वैशिष्ट्ये :

  • जगात प्रथमच गुळवेलाचे जनुकीय क्रमनिर्धारण पूर्ण

  • गुळवेलाच्या पाणातील पेशींचे सविस्तर जनुकीय क्रमनिर्धारण

  • १.०१ अब्ज बेस पेअर ज्यामध्ये १९ हजार ४७४ जनुकांचे निर्धारण करण्यात आले

  • या प्रजातीतील सर्व वनस्पतींसाठी तसेच पुढील संशोधनासाठी उपयोग होणार

संशोधनाचे फायदे :

  • उत्तम प्रतीचे आयुर्वेदिक गुणधर्माच्या प्रजातींची निवड करता येईल

  • गुळवेलाचे उत्पादन आणि आयुर्वेदिक मूल्य वाढविण्यासाठी संशोधनात उपयोगी

  • विविध रोगांवरील गुळवेलाचा उपयोग वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध करता येईल

  • गुळवेलांच्या दर्जेदार औषधांची निर्मिती आणि परिणामकारकता तपासता येणार

  • आयुर्वेदिक संशोधनासाठी जनुकीय क्रमनिर्धारणाचा फायदा होणार

आयुर्वेदातील गुळवेलाचा वापर :

कर्करोग, ज्वर, त्रिदोषविकार, त्वचा रोग, नेत्र विकार, पंडुरोग, प्रमेह, मधुमेह, मूत्रविकार, यकृत विकार, रक्तशर्कराविकार, वमनविकार, संग्रहणी, सर्दी पडसे, हृदयविकार आदींसाठी होतो.

गुळवेलामध्ये तयार होणाऱ्या प्रत्येक औषधी मुलद्रव्यांची निर्मिती जनुकीय क्रमनिर्धारातून सिद्ध करता येईल. याद्वारे गुळवेलातील आयुर्वेदिक घटकाचे गुणधर्म वाढविता येईल. गुळवेलाच्या औषधांची विशिष्ट आजारावरची परिणामकारकता कॉम्प्युटर सिम्युलेशनद्वारे पडताळता येईल.

- डॉ. विनीत शर्मा, सहयोगी प्राध्यापक, आयसर भोपाळ

जनुकीय क्रमनिर्धारणाच्या आधारे गुळवेल पुन्हा एकदा आधुनिक विज्ञानाच्या कसोटीवर खरे उतरत आहे. आयुर्वेदातील संशोधनाबरोबरच शास्त्रीय आधारामुळे जगभरातील त्याची स्वीकृती वाढेल.

- वैद्य विनायक खडीवाले, पुणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com